संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

‘महाबीज’ने रब्बीसाठी मागवले 'आंध्र'तून हरभरा बियाणे

टीम अॅग्रोवन

अकोला  ः यंदाच्या रब्बी हंगामात राज्यातील लागवड क्षेत्रात होत असलेली वाढ लक्षात घेत ‘महाबीज’ने आंध्र प्रदेशातून सुमारे १६ हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा बियाण्याची आयात केली आहे. शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न राहणार महाबीजच्या सूत्राने सांगितले.

पावसामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. परंतु हाच पाऊस आता रब्बीसाठी पोषक ठरत आहे. सध्या रब्बी पिकांची लागवड सुरू झाली आहे. राज्यात या हंगामात रब्बीचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या यंत्रणांनी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत वाढीव क्षेत्रावर पेरणीचे यंदाही नियोजन केले. 

वाढीव पेरणी, लागवड क्षेत्र लक्षात घेत रब्बी हंगामासाठी महाबीजने तीन लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्याची तयारी केली. त्यानुसार आतापर्यंत सव्वादोन लाख क्विंटलपेक्षा अधिक बियाण्यांची विक्रीसद्धा झाली आहे. हंगामासाठी शासनाच्या विविध योजनांमधून तसेच खुल्या प्रकारानेही महाबीजचे बियाणे अधिकृत विक्रेत्यांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचविले जात आहे. हंगामात महाबीजने दोन लाख २० हजार क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले. सोबतच रब्बी ज्वारीचे १४ हजार, गव्हाचे ७० हजार आणि करडई ६५० क्विंटल बियाणे  उपलब्ध करुन देण्याचे नियोजन होते.

यानुसार बियाण्याचा पुरवठा बाजारपेठेत केला जात आहे. या रब्बीत हरभऱ्याचे लागवड क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. परिणामी, बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी हरभऱ्याचे आंध्र प्रदेशातून बियाणे मागवण्यात आले. गरजेनुसार हे बियाणे मागविले जात राहिल, अशी माहिती सूत्रांनी दिली. रब्बीत सर्व पिके मिळून किमान पाच लाख हेक्टरसाठी बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन महाबीजचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT