माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचित
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचित 
मुख्य बातम्या

माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचित

टीम अॅग्रोवन

नागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे (माफसू) बुधवारी (ता. १७) झालेल्या भरतीसाठी चुकीने मुलाखतपत्र पाठविले गेल्याने एक उमेदवार मुलाखतीपासून वंचित राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.    दरम्यान, या प्रकरणी लिपीकाच्या चुकीमुळे शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तीला कॉल गेला. संबंधित उमेदवाराचे शिक्षण हे जनरल विषयात होते. ते मेडिसीन विषयात असण्याची गरज होती, असे स्पष्टीकरण माफसू तर्फे देण्यात आले.​

वनविभागाअंतर्गत गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे. या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या उपचाराची जबाबदारी माफसूवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता माफसूद्वारे पदाची भरती करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार बुधवारी (ता. १७) मुलाखतीचा कार्यक्रम ठरला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्‍यातील जटाळा येथील दत्तात्रय किसन इंगोले यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. विषयतज्ज्ञ (पशुवैद्यक औषध) या पदाकरिता त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. इतर सर्वांची मुलाखत प्रक्रिया पार पडली. परंतु वेळ संपल्यावरही दत्तात्रय इंगोले यांना मात्र मुलाखतीसाठी निवड समितीसमोर जाण्याची संधी देण्यात आली नाही. याबाबत माफसू प्रशासनाकडे विचारणा केल्यावर त्यांना धक्‍काच बसला. चुकीने मुलाखतपत्र तुम्हाला पोचले, असे कारण त्यांना सांगण्यात आले.

"लिपीकाच्या चुकीमुळे शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तीला कॉल गेला. परंतू निवड प्रक्रिया पारदर्शी झाली आहे. निवड समिती कडून ती प्रभावीपणे राबविली गेली. संबंधित उमेदवाराचे शिक्षण हे जनरल विषयात होते. ते मेडिसीन विषयात असण्याची गरज होती. माफसुच्या कारभारात सुधारणांसाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारामुळे त्याला खिळ बसते. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे." - अनुपकूमार प्रभारी कुलगूरु माफसू विभागीय आयुक्त, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT