सत्तेच्या लालसेपोटी राज्यात  ऑटो रिक्षा सरकार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा In the lust for power in the state Auto Rickshaw Government: Union Home Minister Amit Shah 
मुख्य बातम्या

सत्तेच्या लालसेपोटी राज्यात ऑटो रिक्षा सरकार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी : जनादेश आणि सर्व राजकीय सिद्धांत पायदळी तुडवून सत्तेच्या लालसेपाटी राज्यात तीन पक्षांनी ऑटो रिक्षा सरकार बनविले आहे. परंतु त्यांची तोंडे तीन दिशेला आहेत. त्यामुळे हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. 

गृहमंत्री शाह यांच्या हस्ते पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. त्यावेळी शहा बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, विनोद तावडे, नीलेश राणे, आमदार नीतेश राणे आदी उपस्थित होते. 

गृहमंत्री शाह म्हणाले, ‘‘आम्ही कधीही बंद खोलीत चर्चा करीत नाही. आमची भूमिका उघड असते. बिहारमध्ये आमची भूमिका स्पष्ट होती. त्या भूमिकेनुसारच सर्व झाले. परंतु महाराष्ट्रात कधीच कुणाला शब्द दिला नाही. तरीही काही लोक बंद खोलीतील चर्चेबद्दल बोलत आहेत. राज्यात अस्तित्वात आलेले सरकार ऑटो रिक्षा सरकार आहे. निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी बाबासाहेबांचे विचार आणि राजकीय सिद्धांत नदीत विसर्जित केले आहेत. आम्ही तसे कधीही करणार नाही. राज्यात जनादेश काय होता आणि सत्तेसाठी काय झाले, हे आपण पाहिलेले आहे. राज्यातील सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे.’’ 

कोरोनाचा यशस्वी सामना केला  शहा म्हणाले, ‘‘कोरोनामुळे १३० कोटी भारताचे काय होईल, असा प्रश्न जगाला पडला होता. परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली या संकटाचा यशस्वी सामना केला. त्यामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाचे सकारात्मक योगदान आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनामध्ये केलेले काम खूप मोठे आहे. सध्या देशात लसीकरण सुरू आहे. आरोग्य क्षेत्रावर प्रचंड काम या कालावधीत झाले. देशात गेल्या ७० वर्षांत दोन एम्स होते, परंतु आता २२ एम्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मातृभाषेत नीट परीक्षा देता येत असल्यामुळे अनेक तरुण-तरुणी या क्षेत्राकडे वळत आहेत. देशातील प्रत्येक गावापर्यंत चांगली आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे.’’ 

विरोधानंतर समर्थन ही शिवसेनेची पद्धत  विकासकामांना प्रथम विरोध आणि नंतर समर्थन देणे, ही शिवसेनेची पद्धत आहे. मुंबई मेट्रोच्या बाबतीत सुद्धा त्यांची तशीच भूमिका राहिली आहे. समृद्धी महामार्गाला देखील त्यांनी विरोध केला होता. परंतु त्यावेळी विरोध करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गाची पाहणी करण्यासाठी दोन दोनदा जातात, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT