परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान
परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान 
मुख्य बातम्या

नांदेड : परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, वेचणीस आलेल्या कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नायगाव मंडळात सर्वाधिक १५१ मिलिमीटर पाऊस झाला.

नायगाव, नरसी, मांजरम, खानापूर, शहापूर, पेठवडज या सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक मंडळांमध्ये रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील कापणी केलेल्या सोयाबीन पिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ४१ मंडळांमध्ये हलक्या ते जोरदार पाऊस झाला. नायगावसह धर्माबाद, बिलोली, देगलूर या सीमावर्ती भागातील तालुक्यासह मुखेड, कंधार, लोहा, उमरी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस झाला. कापणी केलेले सोयाबीन, बोंडातून फुटून वेचणीस आलेला कापूस, खोलगट भागातील जमिनीमध्ये पाणी साचल्याने कपाशी, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. 

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि बनवस मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे सोयाबीनच्या सुगीच्या कामात अडथळे येत आहेत. रब्बीच्या पेरणी लांबणीवर पडली  आहे.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)  नांदेड जिल्हा ः नायगाव १५१, नरसी ९३, मांजरम ७१, बरबडा ५४, कुंटूर ५२, धर्माबाद ४०, जारिकोट ४२, करखेली १७, बिलोली ३५, आदमपूर २७, लोहगाव ६०, सगरोळी ४०, कुंडलवाडी ५५, देगलूर ५८, खानापूर ७५, शहापूर ७०, मरखेल २२, मालेगाव २२, हानेगाव ४५, मुखेड ५८ जांब ४५,  येवती ५०, जाहूर ४२, चांदोला ५२, मुक्रमाबाद २७, बाऱ्हाळी २७, कंधार ४५, कुरुला ३०, उस्माननगर १६, बारुळ ४, पेठवडज ८०, फुलवळ ३८,  लोहा ११, माळाकोळी ९, कलंबर ३५, कापशी १५, सिंदी ६, गोळेगाव २५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT