loss Due to 'nisarga' in Ratnagiri district
loss Due to 'nisarga' in Ratnagiri district 
मुख्य बातम्या

‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात दाणादाण

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दाणादाण उडवली. सर्वाधिक फटका मंडणगड, दापोलीसह गुहागर तालुक्यांना बसला. तर, रत्नागिरी, राजापूरमध्ये अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळली. या वादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले; मात्र जिवीतहानी झालेली नाही. किनाऱ्‍यावर उभ्या केलेल्या नौकांचेही मोठे नुकसान झाले. 

हवामान विभागाच्या निरदर्शानुसार पहाटेपासून जिल्हयात निसर्ग वादळाचा परिणाम जाणवू लागला. रात्री हलका वारा आणि पाऊस सुरु होता. मात्र पहाटे पाच वाजल्यापासून वादळाने रौद्ररूप धारण केले. बुधवारी सकाळी त्यात भर पडली.

किनारी भागात त्याची तीव्रता अधिक जाणवत होती. वेगवान वाऱ्‍यामुळे झाडे पिळवटून टाकली होती. संगमेश्वर, रत्नागिरीत अनेक ठिकाणी झाडे घरावर पडून नुकसान झाले. महावितरणने अनुचित प्रकार टाळण्यासाठी रात्रीच वीजपुरवठा खंडित केला होता. तो सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी कार्यरत होते. 

दापोली, गुहागर, मंडणगड तालुक्यातील किनारी भागात वादळाने कहर केला. एनडीआरएफची दोन्ही पथके सुरक्षेसाठी तैनात केली आहेत. या तीन तालुक्यातील सुमारे चार हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव मार्गावरील बानखिंड येथे झाड कोसळल्याने शिरगाव च्या दिशेने जाणारा रस्ता बंद झाला आहे, फक्त दुचाकी वाहने जाण्यासाठी जागा आहे. 

चिपळूण परिसरात मध्य रात्रीपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. गव्हे, पंचनदी, आसूद येथील बागायतीमधील पोफळी मोठ्या प्रमाणात मोडल्या. सुपारी बागायतदारांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विविध कंपन्यांच्या मोबाईल सेवा बंद झाल्याने संपर्क यंत्रणा बंद पडली. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने लगतच्या काही घरांमध्ये समुद्राचे पाणी घुसले. राजापूर तालुक्यातील जैतापूर बाजारपेठेत भरती आणि वादळामुळे जास्त पाणी घुसले.  तेरा खलाशांसह जहाज भरकटले 

दापोली दाभोळ मार्गावर असलेले खोके वाऱ्यामुळे रस्त्यावर आले. मिरकरवाडा येथे भल्यामोठ्या २ जहाजांनी आसरा घेतला होता. हे दोन्ही जहाजे भगवती बंदर जेटी येथे नांगर टाकून उभी होती. यापैकी एका जहाजाला निसर्ग वादळाचा जोरदार फटका बसला. नांगर तुटल्याने हे जहाज भरकटले. या बार्जमध्ये १३ खलाशी असून त्यांच्या बचावासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. स्थानिक नागरिकही बचावकार्यात सहभागी झाले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT