रणजितसिंह नाईक निंबाळकर
रणजितसिंह नाईक निंबाळकर 
मुख्य बातम्या

माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर

टीम अॅग्रोवन

मुंबई/ सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने अखेर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने शुक्रवारी ११ उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली. नाईक निंबाळकर हे काही दिवसांपूर्वीच सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपात दाखल झाले. आता त्यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्याशी होईल. 

निवडणूक जाहीर झाल्यापासून माढा मतदारसंघात रोज घडामोडी घडत होत्या. राष्ट्रवादीतून भाजपत आलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. रणजितसिंह यांचे वडील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांच्याही नावाची चर्चा होती. 

ऊर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून लढणार अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. ऊर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. युतीसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा धुव्वा उडवल्याने निरुपम यांनी येथून निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT