संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सव्वालाख विहिरी खोदल्या, मग त्या आहेत कुठे : राज ठाकरे 

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः राजीव गांधी यांच्यानंतर ३० वर्षांनी देशाने एका व्यक्तीला बहुमत दिले. देशातल्या लोकांनी एवढे प्रेम केले; पण तुम्ही काय दिले, केवळ थापा मारल्या, फसवणूक, पिळवणूक आणि आरक्षणाच्या नावाखाली भांडणे लावली. शेतकऱ्याला तर पार देशोधडीला लावले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'आम्ही १ लाख २० हजार विहिरी खोदल्या. मग त्या आहेत तरी कुठे, कुठल्या विहिरीवर मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाणी भरले? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना सरकारला विचारला. माझ्या सभांच्या खर्चाचा हिशेब मोजता, आधी तुमच्या पाच वर्षांच्या थापा मोजा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

सोलापुरातील कर्णिकनगरमधील फुटबॅाल मैदानावर सोमवारी (ता. १५) सभा झाली. मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया महिंद्रकर, नाशिकचे नितीन भोसले आदी या वेळी उपस्थित होते. या सभेला मनसेशिवाय काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्तेही मोठया संख्येने उपस्थित होते. देशातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून जाहिरात करण्यात आलेल्या हरिसाल (अमरावती) येथील येथील कृपाल या तरुणाला ठाकरे यांनी या वेळी व्यासपीठावर बोलावले. या तरुणाने जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केले होते. सध्या तो नोकरीच्या शोधात फिरतो आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि सांगा हाच का डिजिटल इंडिया आणि या बेरोजगारीचं काय, असा प्रश्न केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT