In Loha-Kandhar No clearance to the pond
In Loha-Kandhar No clearance to the pond 
मुख्य बातम्या

लोहा-कंधारमध्ये तलावाला नाही मंजुरी

टीम अॅग्रोवन

नांदेड : ‘‘कंधार-लोह्याच्या आमदारांनी या क्षेत्रात नवीन २४ साठवण (सिंचन) तलावास मंजुरी मिळाल्याचे जाहीररीत्या सांगितले. परंतु शासनाकडून एकाही तलावाला प्रशासकीय मान्यता नाही.आमदार खोटे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत’’, असा आरोप माजी आमदार शंकर धोंडगे यांनी केला.

कंधार तालुक्यातील बाचोटी येथे त्यांनी बुधवारी (ता. १२) पत्रकारांशी संवाद साधला. गोदावरी महामंडळाकडून नुकतीच नांदेड जिल्ह्यातील प्रस्तावित ४० सिंचन प्रकल्पांसाठी ४.७९६ टीएमसी पाणी साठविण्याला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार तत्त्वतः मान्यता दिली आहे. परंतु लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लगेच २००० हजार कोटी निधी, ५५ हजार एकर जमीन सिंचन व २४ तलावांना मंजुरी असे जाहीर करून टाकले. खरे तर जिल्ह्यातील (वॉटर ॲलोकेशन) पाणी उपलब्ध पाहता लोहा-कंधारसाठी (२ टीएमसी) येईल. त्याचा हिशोब काढल्यास तीन हजार हेक्टर शेती सिंचन होऊ शकते. त्यांनी ५५ हजार एकर हा आकडा कसा काढला कळत नाही, असे शेंडगे म्हणाले.

कोणत्याही प्रकल्पाचे सर्वेक्षण अंदाजपत्रके, भूसंपादन, तांत्रिक मान्यता, वैयक्तिक पाणी उपलब्धता नसताना दोन हजार कोटींचा निधी मंजूर झाला, हा जावई शोध कसा लावला, हे ही कळत नाही, असा प्रश्‍न शेंडगे यांनी विचारला. 

या वेळी दत्ता पवार, मनोहर पाटील-भोसीकर, शिवदास धर्मापुरीकर, दिलीप धोंडगे, संजय पाटील-कराळे, ॲड. विजय धोंडगे, शिवराज पाटील-धोंडगे, शरद भागानगरे, भरत चिखलीकर, माधव मोरे, अनिल मोरे, मन्मथ कल्याणकर, सुरेश शिरसे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT