locust attack on crops
locust attack on crops  
मुख्य बातम्या

रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबल्याने भारत-पाकिस्तान सीमाभागात टोळधाडीचा प्रादुर्भाव कायम आहे. लांबलेल्या मॉन्सूनमुळे पोषक स्थिती असल्याने टोळचा मुक्कामही लांबला आहे. त्यामळे शेतात असलेल्या खरीप पिकांचे आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमेरिकेच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) प्रसिद्ध केलेल्या अहवाल दिली आहे.  ‘‘यंदा उन्हाळ्यापासून राजस्थान आणि कच्छ भागात टोळप्रभावित जवळपास दोन लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर नियंत्रण पथकाने नियंत्रणात्म उपाय केले आहेत. तर नोव्हेंबरपासून १३ हजार २८ हाजर हेक्टर क्षेत्रावर उपाय केले आहेत. १ ते १० नोव्हेंबर या काळात पाकिस्तानमधील चोलिस्तान, नारा आणि थारपारकर वाळवंटात येथे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर नियंत्रणात्मक उपाय केले आहेत. परंतु, मॉन्सून लांबल्याने भागात अद्यापही हिरवळ कायम असल्याने टोळचा मुक्काम कायम आहे. त्यामुळे पिकांवरील धोकाही कायम आहे,’’ असेही ‘एफएओ’ने म्हटले आहे. टोळचे वेळीच प्रभावी नियंत्रण न केल्यास शेतात असलेल्या खरीप पिकांचे आणि येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. टोळ एक छोटा थवाही २५०० लोकांना एक दिवस लागणाऱ्या अन्नाएवढे नुकसान करू शकते. राजस्थान आणि गुजरात मध्ये लहान धान्ये, भात, मका, तूर, ऊस, बार्ली, कापूस आणि भाजीपाल्याचे उत्पादन होते.  राजस्थानात १९९३, १९९७, २००५ आणि २०१० मध्ये टोळचे आक्रमण झाले होते. १९९३ मध्ये तीन लाख १० हजार ८८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तर २००५ मध्ये १६ हजार ४४० हेक्टरवरील पीक टोळने फस्त केले होते, अशी माहिती राज्यस्थान सरकारने दिली.  स्थलांतराला प्रारंभ टोळचे काही थवे उन्हाळ्यात प्रजनन होणाऱ्या भागातून, भारत-पाकीस्तन सीमेसह स्थलांतर करत आहेत. टोळचे प्रजनन या भागात उन्हाळ्यात वाढते. काही थव्यांनी स्थलांतर सुरू केले असले, तरीही राजस्थान आणि गुजरातमध्ये टोळचे संकट कायम आहे. या दोन्ही राज्यांत टोळने मे महिन्यापासून पिकांचे मोठे नुकसान केले. या भागातील चांगल्या पावसाने नाकतोड्यांच्या प्रजननास मदत झाली आहे.  उपायानंतरही धोका  टोळ नियंत्रणासाठी भारत सरकारने राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये विविध उपाय केले आहेत. परंतु, पोषक वातावरणामुळे टोळची संध्या कमी करणे कठीण झाले आहे. सरकारने टोळ नियंत्रण पथक स्थापन केले आहे. या पथकाने जुलैमध्ये या दोन्ही राज्यातील पाकिस्तान सीमेवरील ३० हजार ४२३ हेक्टर क्षेत्रावर नियंत्रणात्मक उपाय केले आहेत.  इतर देशांनाही धोका भारताबरोबरच इतर देशांनाही धोका असल्याचे ‘एफएओ’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. टोळचा प्रवास करण्याच्या मार्गावर असणाऱ्या देशांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. सौदी अरेबिया, इथियोपिया, सोमालिया, केनिया, सुदान आणि येमेन या देशांमध्ये टोळचे मोठे आक्रमण होण्याची शक्यता आहे, असा इशारा ‘एफएओ’ने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT