loan waiver scheme
loan waiver scheme  
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘ऑफलाइन’ राहणार कर्जमाफी?

तात्या लांडगे

सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे. मागील ऑनलाइन कर्जमाफी आणि आगामी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिकाऱ्यांमार्फत जाणून घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या सूचनांचा अहवाल राज्य सरकारला देण्यात येणार असून, प्रक्रिया राबविण्याविषयीचा निर्णय यानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे.  सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्यांशी नुकताच (ता. ७) संवाद साधून मते जाणून घेतली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांचे चालू बाकीदार, अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जदारांसह थकबाकीदारांची माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  राज्यातील इतर बँकांप्रमाणे पुणे जिल्हा बॅंकेला थकबाकीदारांसह चालू बाकीदारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी गावोगावी आपले सेवा सरकार केंद्रांची उपलब्धता नाही. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियाच माहिती नसल्याने अर्जात अनेक त्रुटी राहिल्याचा अनुभव गेल्या वेळेच्या कर्जमाफीवेळेचा आहे. त्यामुळे मागील कर्जमाफीच्या ऑनलाइन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्या आणि अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहीले. या पार्श्‍वभूमीवर आता अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत.  दरम्यान, राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने राज्यातील शेतकऱ्यांकडील एकूण थकबाकीदार व थकबाकी, चालू बाकीदारांसह अन्य कर्जदारांची माहिती मागविल्याचे सहकार विभागाचे अप्पर आयुक्‍त डॉ. आनंद जोगदंड यांनी सांगितले. कर्जमाफीची संभाव्य प्रक्रिया...

  • २००८-०९ व मागील ऑनलाइन कर्जमाफीतील त्रुटी टाळण्याचे या वेळी नियोजन
  • आगामी कर्जमाफीबद्दलच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर
  • कर्जमाफीची माहिती बॅंकांनाच द्यावी लागणार 
  • शेतकऱ्यांची ऑनलाइनमधून सुटका होण्याची शक्यता
  • चुकीचा लाभ मिळाल्यास संबंधित रक्‍कम वसुलीची जबाबदारी त्या बॅंकेवर राहणार
  • चालू थकबाकीदारांसह अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जदारांची राहणार स्वतंत्र माहिती
  • सहकार विभागाने दिलेल्या नमुन्यात कर्जदारांची माहिती बॅंकांना द्यावी लागणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT