नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे आदेश 
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे आदेश  
मुख्य बातम्या

नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे आदेश 

टीम अॅग्रोवन

नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी देशात व राज्यात बंद असताना व शेतकरी संकटात असतानाही नगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेने २०१९-२० मधील खरीप हंगामातील पात्र शेतकऱ्यांकडून ३१ मार्चपर्यंत कर्जवसुली करावी, असे आदेश सर्व सेवा संस्थांना शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी काढले आहेत. शनिवारी (ता. २८) व रविवारी (ता. २९) दोन दिवस सुट्ट्या असल्या तरी कर्ज वसुलीसाठी सर्व शाखा चालु ठेवण्याचे बॅंकेने काढलेल्या पत्रकात नमुद केले आहे. 

शेतकरी अडचणीत असताना वसुलीचे आदेश काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे.  राज्यात व देशात कोरोना व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून बंद ठेववण्यात आला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात आर्थिक व्यवहार बंद आहेत. बाजार समित्याही बंद असल्याने भाजीपाला, फळे, शेतमालाची विक्री बंद आहे. त्यामुळे सर्वाधिक शेतकरी अडचणी आला आहे. असे असताना ३१ मार्चपर्यंत थकबाकी असलेल्या २०१९-२० मधील वाटप केलेल्या अल्पमुदत कर्जाची शेतकऱ्यांकडून वसुली करावी, असे आदेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकने काढले आहेत. ३१ मार्चपर्यंत भरणा करुन घेतला तर त्या शेतकऱ्यांना शासनाचे व्याज सवलत व इतर लाभ मिळतील असे बॅंकेच्या परिपत्रकात नमुद केले आहे. 

ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज भरणा आहे त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष, फोनवर रकमेची जाणीव करुन द्यावी असे सांगण्यात आले असून शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे बॅंकेच्या शेतीकर्ज विभागाचे सरव्यवस्थापकांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. शेतकरी अडचणीत असताना वसुलीचे आदेश काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टीळक भोस यांनी याबाबत सहकार आयुक्तांनी निवेदन देऊन शेतकरी अडचणीत असताना नगरच्या जिल्हा बॅंकेकडून सुरु असलेली पठाणी कर्जवसुली थांबवावी अशी मागणी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT