Live sale of 6 thousand quintals of vegetables, fruits in Nanded district
Live sale of 6 thousand quintals of vegetables, fruits in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल भाजीपाला, फळांची थेट विक्री

टीम अॅग्रोवन

नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे विक्रीसाठी सुविधा देण्यास कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सरसावले आहेत. ‘आत्मा’अंतर्गंतच्या शेतकरी गटांतील शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता.२७) ते मंगळवार (ता.७) या कालावधीत एकूण ५ हजार ९८५ क्विंटल भाजीपाला-फळांची विक्री केली. शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री उपक्रमात लातूर कृषी विभागात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

‘आत्मा’अंतर्गंत जिल्ह्यात एकूण ७८ भाजीपाला उत्पादक शेतकरी गट आहेत. यंदा सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या क्षेत्रावर विविध भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत आहेत. आत्माचे प्रकल्प संचालक रवीशंकर चलवदे, उपसंचालक एम. के. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना भाजीपाला-फळे वाहतुक परवाने देण्याच्या कामात सहकार्य करत आहेत. 

जिल्ह्यात शेतकरी ते ग्राहक उपक्रमात प्रतिदिन ७० ते८० क्विंटल भाजीपाल्याची थेट विक्री होत आहे. यात नांदेड जिल्हा लातूर कृषी विभागात अव्वल ठरला आहे.

जिल्ह्यातील भाजीपाला, फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, संघ, शेतकरी गट यांची माहिती संकलीत करण्यासाठी कृषी उपसंचालकांच्या अधक्षेतेखालील जिल्हास्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटातील सदस्यात एम.के सोनटक्के (मो.क्र.७५८८६३२१६१), तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी (मो.क्र.८४८९१६८३७० ), संगणक परिचालक श्रीहरी बिरादार (मो.क्र.८२७५५५६३१६) यांच्याशी शेतकऱ्यांनी संर्पक करावा, असे आवाहन चलवदे यांनी केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT