Liquor store closed in protest of women
Liquor store closed in protest of women 
मुख्य बातम्या

महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद

टीम अॅग्रोवन

सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील लगतच्या कवठा (नागपूर जिल्हा) गावात नवीन परवानाधारक देशी दारू दुकान मुकेश रामगोपाल जयस्वाल यांनी सुरू केले होते. याला कवठा गावातील महिलांनी कडाडून विरोध केला. यात प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढून अखेर दारूचे दुकान हद्दपार केले.  सविस्तर वृत असे, की लगतच्या नागपूर जिल्ह्यातील वर्धा जिल्हा सीमेलगतच्या कवठा गावात नव्याने परवानाधारक दारूचे दुकान उघडले होते. मात्र कवठा येथील सर्व महिलांचा याला प्रखर विरोध केला. स्थानिक स्तरावर आंदोलनसुद्धा केले.  दारूचे परवानाधारक दुकान बंद करायचे कसे असा प्रश्‍न या महिलासमोर उभा ठाकला. सदर गंभीर विषय गावकरी महिलांनी स्थानिक आमदार समीर मेघे यांच्यासमोर मांडला. त्यांनी महिलांची मागणी पाहता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार संपर्क करून पाठपुरावा केला. तरीही परवानाधारक मुकेश जयस्वाल यांनी १ जानेवारी २०२१ रोजी कवठा येथे दारू दुकान सुरू केले. यात गावकरी महिलांनी केलेल्या आंदोलनामुळे नियमानुसार १७ सप्टेंबर २०२१ रोजी निवडणूक घेण्यात आली.  निवडणुकीच्या निकालात दारू दुकानास विरोध असणाऱ्या मतांची संख्या (आडवी बाटली) १५१ व समर्थनार्थ मतांची संख्या (उभी बाटली) केवळ ८ मते पडली. या निवडणुकीवर न्यायालयात परवाना धारकांकडून स्थगिती घेण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाकडून तातडीने सुनावणी घेण्यात आली व सदर प्रकरणी न्यायालयाकडून गावकरी महिलांच्या बाजूने निकाल देण्यात आला. त्यात परवानाधारकांनी स्थगिती उठवण्यात सुप्रिम कोर्टात धाव घेतली. असे तरी न्यायालयाने हे प्रकरण दाखल करून न घेता खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला.  न्यायालयाचे निर्णयाने मतमोजणीस असलेली स्थगिती उठल्यामुळे मंगळवार ११ जानेवारी रोजी तहसील कार्यालय (नागपूर ग्रामीण) येथे पुन्हा मत मोजणी झाली. यात दारू दुकानास विरोध असणाऱ्या आडवी बाटलीला १५१ मते तर समर्थनार्थ उभ्या बाटलीला केवळ ८ मते मिळाली. यामुळे गावकरी महिलांचा यात विजय झाल्याने असल्याने मुकेश जयस्वाल यांचा कवठा गावाकरिता दारू दुकान परवाना रद्द झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT