Light rain forecast; Minimum temperature increase possible
Light rain forecast; Minimum temperature increase possible 
मुख्य बातम्या

हलक्या पावसाचा अंदाज; किमान तापमान वाढ शक्य 

टीम अॅग्रोवन

पुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात गारठा वाढला. काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरले. तर पुन्हा पावसाला पोषक हवामान झाल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. १२ ते १८ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. 

४ ते ११ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आठवड्याच्या सुरुवातीस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रायगड, सोलापूर, लातूर जिल्ह्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अखेरच्या टप्प्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात कमी झाल्याने गारठा वाढला. 

बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील राज्यांसह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ ते १८ नोव्हेंबर या आठवडाभरामध्ये कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 

राज्यात गेल्या आठवडाभरामध्ये अखेरीस किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढल्याचे दिसून आले. सध्या किमान तापमानात वाढ होत असून, १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि उत्तर विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी कमी, तर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान २ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात किमान तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT