कीटकनाशकांचे लिफलेटस मराठीतून आणि ठळकपणे द्या
कीटकनाशकांचे लिफलेटस मराठीतून आणि ठळकपणे द्या 
मुख्य बातम्या

कीटकनाशकांचे लिफलेटस मराठीतून आणि ठळकपणे द्या

टीम अॅग्रोवन

पुणे : कीटकनाशकांपासून विषबाधेचे वाढते प्रकार लक्षात घेता कीटकनाशकांची विक्री करताना शेतकऱ्यांना दिली जाणारे माहितीपत्रक (लिफलेटस) मराठी भाषेतून असावे, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.  ‘‘यवतमाळमधील विषबाधा प्रकरणामुळे यंदाच्या हंगामात काळजी घेणार आहोत. बोंड अळीला प्रतिकारक वाण यंदाही बाजारात आलेले नाही. त्यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव गेल्या हंगामासारखाच राहिला तर कीटकनाशकांचा वापरदेखील वाढू शकतो. यामुळे पुन्हा विषबाधेच्या दुर्घटना होऊ न देण्यासाठी आम्ही कीटकनाशकांच्या कंपन्या व विक्रेत्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. कीटकनाशकांसोबत माहितीपत्रके देताना भाषा सोपी नसते, मराठी भाषेतून ठळक आणि स्पष्ट माहिती देणाऱ्या कंपन्यादेखील अत्यल्प आहेत. ‘‘केंद्रीय कीटकनाशके मंडळाच्या नोंदणी समितीने मंजूर केलेल्या नियमावलीतच कंपन्यांनी कीटकनाशकांची लिफलेट शेतकऱ्यांना द्यावीत, असा आमचा आग्रह आहे. सोप्या भाषेत मराठीतून ठळकपणे माहिती दिल्यास शेतकरी सावध होतात. त्यामुळे दुर्घटना टळते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.  कीटकनाशकांच्या ऑनलाइन विक्रीलादेखील कृषी विभागाने मनाई केली आहे. ‘‘ऑनलाइन विक्रीचे प्रकार राज्यात निदर्शनास आलेले नाहीत. तथापि, कीटकनाशके कायदा १९६८ मधील तरतुदींचा भंग न करता कंपन्यांनी कीटकनाशकांचे उत्पादन आणि विक्री करावी. मात्र, साठवणुकीच्या ठिकाणी व विक्रीच्या ठिकाणी परवाना असल्याशिवाय कीटकनाशके आणू नयेत अशादेखील सूचना देण्यात आलेल्या आहेत,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  ऑरगॅनोस्फॉस्परस किंवा क्लोरीन गटातील कीटकनाशके मानवी आरोग्याची हानी करतात. त्यामुळे कृषी विभागाने जहाल कीटकनाशकांच्या विक्री व्यवस्थेवर जास्त लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यातील क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ‘‘ऑरगॅनोफॉस्परस, कार्बामेट किंवा क्लोरीन गटातील कीटकनाशकांवर आमचे जास्त लक्ष राहील. प्रोफनोफॉस तसेच प्रोफेनोफॉस व सायपरमेथ्रीन याचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस किंवा डायफेन्थुरॉन या जहाल कीटकनाशकांच्या वापराबाबत शेतक-यांनी खबरदारी घ्यावी. एखाद्या भागात या कीटकनाशकाची विक्री अचानक वाढल्यास कृषी खात्याकडून माहिती घेतली जाईल,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT