Licenses of six fertilizer sellers in Akola district revoked
Licenses of six fertilizer sellers in Akola district revoked 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे परवाने रद्द

टीम अॅग्रोवन

अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची ओरड शेतकऱ्यांकडून झाली होती. कृषी खात्याला जनतेच्या रोषाला बळी पडावे लागले. आकडेवारीमध्ये जिल्ह्यात खत दिसायचे तर दुसरीकडे कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. त्यातच कृषी विक्रेत्यांनी रासायनिक खत खरेदी-विक्रीचे विहित नमुन्यातील मासिक प्रगती अहवालही प्रशासनाकडे सादर केले नव्हते. याची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील १९ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

सहा विक्रेत्यांचे परवाने रद्द तर १२ परवाने निलंबित करण्यात आले असून एकाला समज देण्यात आली आहे. या कारवाईने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी जिल्ह्यातून जाता-जाता या धडक कारवाईचे आदेश बजावले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात या खरीप हंगामात रासायनिक कंपन्यांकडून पुरेसा खत पुरवठा झालेला असतानाही रासायनिक खत पुरवठ्याबाबत कृत्रिम टंचाई सदृश्‍य परिस्थिती तयार झाली होती. अनेकांना रांगा लावून खत घ्यावे लागले. काही ठिकाणी खत उपलब्ध असूनही विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना न देण्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या परिस्थितीमुळे शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनी कृषी खात्याच्या कारभारावर रोष व्यक्त केला.

या अनुषंगाने कृषी विभागाने चौकशी करीत विक्रेत्यांना नोटीस बजावल्या. या नोटीसीला उत्तर मागण्यात आले होते. परंतु संबंधितांनी केलेला खुलासा वस्तुस्थिती धरून नव्हता. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे स्पष्टीकरण अमान्य करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. वाघ यांनी सहा विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.

१२ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले तर एकाला समज देण्यात आली. परवाने रद्द केलेल्‍यात अकोल्यातील चार, तेल्हारा तालुक्यातील दोन विक्रेत्यांचा समावेश आहे. तर दोन महिन्यांसाठी परवाना निलंबित झालेल्या १२ विक्रेत्यांमध्ये अकोल्यातील सहा, तेल्हारा तालुक्यातील तीन, अकोटमधील तीन विक्रेते आहेत. तर अकोल्यातील एकाला ताकीद देण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT