चला मारू निंबोळी अन् मारूया बोंड अळी
चला मारू निंबोळी अन् मारूया बोंड अळी 
मुख्य बातम्या

चला मारू निंबोळी अन् मारूया बोंड अळी; कृषी सहायकाकडून माहिती विस्तार

टीम अॅग्रोवन

अमरावती ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी व्यापक जागृती केली जात आहे. यामध्ये खारीचा वाटा उचलत अचलपूर तालुक्‍यातील एका कृषी सहायकाने स्वतःच गाणी रचत, ती गात, रेकॉर्डिंग करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रचार, प्रसारासाठी पुढाकार घेतला आहे. सुधाकर पाटील, असे या कृषी सहायकाचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमाशीलतेची दखल घेत जिल्हास्तरावर त्यांचा नुकताच गौरवही करण्यात आला.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कापसावर या वर्षी काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्याची तातडीने दखल घेत कृषी विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. यवतमाळ, अकोला तसेच अमरावती जिल्ह्यात नुकसान पातळीच्या खाली बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. मात्र त्याची तीव्रता वाढू नये याकरीता कृषी विभागाने निंबोळीअर्क फवारण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केला. त्याला शेतकऱ्यांमधूनही प्रतिसाद मिळाला. अचलपूरचे कृषी सहायक सुधाकर पाटील यांनी या मोहिमेत जपलेले वेगळेपण निश्‍चितच कौतुकास्पद ठरत आहे. दुचाकीवर साउंड सिस्टीम, बॅनर बांधून त्यांनी हे काम चालविले आहे. त्यांच्या या जागृतीविषयक वेगळेपणाची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी नुकताच त्यांचा गौरव केला. 

माळ्याच्या माळ्यामदी कोण गं उभी! अचलपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक सुधाकर पाटील यांनी बोंड अळी निवारण मोहीम हटके राबविली आहे. स्वमालकीच्या दुचाकीवर त्यांनी त्याकरिता खास साउंड सिस्टीम बांधली असून, त्यावर गाण्यांच्या माध्यमातून ते बोंड अळी निवारण पद्धती विषयी सांगतात. ‘माळ्याच्या मळ्यामदी कोण गं उभी, राखण करते मी रावजी...रावजी चला मारू निंबोळी अन् मारुया बोंड अळी’ अशा चित्रपट गाण्याच्या चालीवर गाणी रचत त्यांनी बोंड अळी निर्मूलन मोहिमेत आपले योगदान दिले आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT