At least 25% on agricultural products Process and sell
At least 25% on agricultural products Process and sell 
मुख्य बातम्या

किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया करून विक्री करा

टीम अॅग्रोवन

जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के शेतमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री करा,’’ असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी दिला.   कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीच्या वतीने आयोजित ऑनलाइन कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शुक्रवारी (ता. २५) प्रथम तांत्रिक सत्रामध्ये डॉ. क्षीरसागर मार्गदर्शन करीत होते. या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त भगवानराव काळे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्रीकृष्ण सोनुने हेही उपस्थित होते.

‘बदलत्या हवामानात मोसंबी व्यवस्थापन’ यावर फळ संशोधन केंद्र, औरंगाबाद येथील प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी पिकाचे व्यवस्थापन करताना आपल्या पिकामध्ये सेंद्रिय कर्बाचे योग्य प्रमाण राखण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा. आंतरपीक घेऊन जमिनीचा पोत सुधारावा. बगीचा दीर्घकाळ राखण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी एकाच बहराचे नियोजन करावे. लागवडीपासून योग्य प्रमाणात खत मात्रा देऊन झाडाची योग्य वाढ करावी, जेणेकरून बगीचा दीर्घकाळ टिकू शकेल व भरपूर उत्पन्न मिळेल.’’

शिंदे म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षात मोसंबी लागवड ही मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यात वाढली आहे.’’ डॉ. पाटील यांचे असेच मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत राहावे.’’ 

डॉ. क्षीरसागर म्हणाले, ‘‘ग्रामीण रोजगाराच्या संधीचा विचार करता आपल्याच शेतात व परिसरात उत्पादित कच्च्या कृषी मालाचा विचार करून त्यावर आपण कमी आर्थिक भांडवलात व्यवसाय सुरू करू शकतो. या साठी सहज सोपे तंत्रज्ञान हे विद्यापीठात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा.’’

‘‘मोसंबी व्यवस्थापन व ग्रामीण रोजगरातील युवकांच्या संधी, हे विषय सध्या अतिशय महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन मोलाचे ठरेल,’’ असे काळे यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी ऑनलाइन उपस्थित होते. विषय विशेषज्ञ अजय मिटकरी यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT