खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळती Leakage at Khapanewadi-Guravwadi dam
खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळती Leakage at Khapanewadi-Guravwadi dam 
मुख्य बातम्या

खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळती

टीम अॅग्रोवन

बाजारभोगाव, जि. कोल्हापूर : जांभळी नदीवरील खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्चूनही बांधकामातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कासारी प्रकल्पाअंतर्गत सुमारे ३५ वर्षांपूर्वी झालेला पडसाळी (ता. पन्हाळा) येथील लघुपाटबंधारे तलाव हा जांभळी नदीच्या खोऱ्यातील शेतीसाठी वरदान ठरला आहे. सिंचन व वाहतूक अशा दुहेरी हेतूने जांभळी नदीवर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. तथापि, पाच-सहा वर्षांपासून बंधाऱ्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यांच्या डागडुजीसाठीचा रेटा वाढल्याने गतवर्षी शासनाकडून निधी मिळताच दुरुस्ती करण्यात आली. बंधाऱ्यांची गळती थांबवण्यासाठी गुरववाडीकडील बाजूला नव्या बांधकामासह अंतर्गत कामे करण्यात आली. 

दरम्यान, दुरुस्तीनंतर यंदा बंधाऱ्यात पाणीसाठा केल्यानंतर पुन्हा गळती लागल्याचे दिसत आहे. दुरुस्तीनंतरच्या ही अवस्था असल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कोल्हापूर : जांभळी नदीवरील खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्चूनही बांधकामातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT