गेल्या हंगामातील तूर अद्यापही गोदामात पडून
गेल्या हंगामातील तूर अद्यापही गोदामात पडून 
मुख्य बातम्या

गेल्या हंगामातील तूर अद्यापही गोदामात पडून

टीम अॅग्रोवन

अकोला : गेल्या हंगामात खरेदी केलेली लाखो क्विंटल तूर ठिकठिकाणच्या गोदामांमध्ये पडून अाहे. नवीन खरेदीला खऱ्या अर्थाने शुक्रवार (ता. २)पासून राज्यात सुरवात झाली. त्यामुळे ही नवीन तूर खरेदी साठविण्याचा प्रश्न काही केंद्रांवर निर्माण होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. गेल्या हंगामात शासनाने हमीभावाने खरेदी केलेली तूर तशीच पडून अाहे. काही प्रमाणात व्यापाऱ्यांना ही तूर देऊन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु संपूर्ण साठा उचलला गेलेला नाही. सद्यःस्थितीत गोदांमामध्ये लाखो क्विंटल तूर पडून अाहे. ही तूर हलविण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्याला गती नाही. शुक्रवारी या हंगामातील तूर खरेदीला सुरवात झाली. प्रत्येक केंद्रावर क्षमतेनुसार दररोज नोंदणी असलेल्या किमान ४० ते ५० शेतकऱ्यांना मेसेज देऊन सुरवातीला बोलविले जाईल. खरेदी सुरू झाल्याने दररोज हजारो क्विंटल तूर खरेदी होणार. त्यामुळे साठवणुकीचा प्रश्न पुढील महिन्यात निर्माण होऊ शकतो. एकट्या वाशीम जिल्ह्यात सध्या सव्वादोन लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर गोदामात साठविलेली अाहे. या जिल्ह्यात पाच लाख क्विंटल खरेदीपैकी अर्धी तूर उचलली गेली. अशीच परिस्थिती इतरही जिल्ह्यांमध्ये अाहे.  अधिकारी म्हणतात चिंतेचे कारण नाही सध्या गोदामामध्ये असलेल्या तुरीच्या मुद्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, अामची उचल प्रक्रिया निरंतर सुरू अाहे. त्यामुळे सध्या तरी गोदामात तूर साठविण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे वाटत नाही. गरज पडल्यास शासना खासगी गोदाम साठविण्यासाठी घेऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT