सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाला शुक्रवारी (ता. ५) दुसऱ्या दिवशीही स्टॉलवर माहिती घेताना शेतकरी.
सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाला शुक्रवारी (ता. ५) दुसऱ्या दिवशीही स्टॉलवर माहिती घेताना शेतकरी. 
मुख्य बातम्या

द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः ‘सकाळ-ॲग्रोवन'च्या वतीने भरवण्यात आलेल्या द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाला शुक्रवारी (ता. ५) सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यासह नजीकच्या सांगली, उस्मानाबाद जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. प्रदर्शनातील कृषिविषयक विविध ज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती घेताना, चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शास्त्रज्ञांशीही चांगलाच संवाद रंगला. उद्या, शनिवारी (ता. ६) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.  सिव्हिल चौकातील ॲचिव्हर्स मल्टिपर्पज हॉलमध्ये प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर शेतकऱ्यांची रेलचेल सुरूच होती. जिल्ह्यासह उस्मानाबाद, सांगली आदी भागातून शेतकरी आवर्जून आले होते. प्रत्येक स्टॉलवर शेतकरी थांबून माहिती घेत होते. आपल्या शंका विचारत होते, त्या माध्यमातून विक्रेते ते शेतकरी असा संवाद घडला, आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या द्राक्षाच्या कलम काड्या, डाळिंबातील टिश्‍युक्‍लचर पद्धती, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने तयार केलेला ज्यूस, डाळिंबाची वाईन, तेल आणि औषधी उत्पादनांची माहिती आणि त्याची वैशिष्ट्ये मोठ्या उत्सुकतेने शेतकरी जाणून घेत होते. त्याशिवाय विविध प्रकारची खते, इन्फास्ट्रक्चर (वायर आणि अँगल) पॉवरटिलर, ब्लोअर, ट्रॅक्‍टर, शेततळे, शेडनेट व हेलग्रीन नेट आदींची माहितीही वेगळी पर्वणी ठरली. प्रदर्शनातील द्राक्ष आणि डाळिंब शेतीशी संबंधित नवीन ज्ञान-तंत्रज्ञानाच्या माहितीने शेतकरी भारावून गेले. दुसरीकडे द्राक्ष-डाळिंबातील चर्चासत्राच्या दालनातून शास्त्रज्ञ-शेतकरी संवादही चांगलाच रंगला.  आजही चर्चासत्रे शनिवारी (ता. ६) दुपारी बारा वाजता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके हे ‘द्राक्षातील सुधारित तंत्रज्ञान व संजीवकांचा वापर' या विषयावर तर दुपारच्या सत्रात तीन वाजता प्रगतिशील शेतकरी अंकुश पडवळे हे ‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व गटशेती'' या विषयावर मार्गदर्शन करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT