वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू लागल्या
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू लागल्या 
मुख्य बातम्या

वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू लागल्या

टीम अॅग्रोवन

सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीचा पूर ओसरत असताना या नदीकाठी असणाऱ्या शेतजमिनी आता कोसळू लागल्या आहेत; तर काही भागात पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक ठिकाणी शेतीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. त्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठी असलेली शेती वाहून गेली. या वेळी पाण्याचा प्रवाह मोठा आणि वेगाचा असल्याने नदीच्या वळणावर मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे भाग वाहून गेले. आता पाणी कमी झाले आहे. त्यामुळे माती ठिसाळ बनली असून शेतीचे शिल्लक राहिलेले भागदेखील पडू लागले आहेत; तसेच अनेक ठिकाणी नदीने पात्र बदलले आहे. ज्यांची शेती नदीकाठापासून दूर होती, त्या ठिकाणी नदीचे पाणी पोचल्याने ती शेती पाण्याखाली गेली. परिमाणी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सन २००५ मध्ये आलेल्या पुराने नदीकाठावरील जमिनीचे मोठे नुकसान केले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना तोकडी मदत मिळाली होती. आतातरी भरीव मदत मिळणार का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागला आहे. यामध्ये पावसाळ्यात नदीचा गाळ साठून पुन्हा उपसलेला डबरा भरेल, अशी त्याची धारणा असते. मात्र या पुराने ती फोल ठरवली.  माती, वाळूउपशामुळे शेतीला फटका महापूर येऊन गेल्यानंतर वारणा आणि कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा झाला. ठेकेदारांनी यंत्राने दिवसरात्र उपसा केला. नदीच्या तळापर्यंत खरडून वाळू उपसली. अगदी पाचशे-हजार फुटावर ठेका घेऊन नदीच्या दोन्ही बाजूंनी नदीतील वाळू नेण्यात आली. वर्षाला चढ्या दराने त्याचा ठेका दिला गेला. नदीतील वाळू संपल्यावर सरकार जागे झाले आणि त्याची अधिकृत उपसाबंदी झाली. त्यात भर म्हणून वीटभट्ट्यांसाठी मातीचा बेसुमार उपसा झाला. नदीलगतची वाळूमिश्रित पोयट्याची माती वीट बनविण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे या मातीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT