lamon
lamon  
मुख्य बातम्या

लिंबे तोडणीलाही महाग 

टीम अॅग्रोवन

अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, लिंबे फेकून देण्याची वेळ आली आहे. पातूर तालुक्यातील सावरगाव येथील उत्पादक ज्ञानेश्‍वर नागलकर यांनी लिंबे फेकून दिली. तोडणीसाठी लागणारा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यावर ही दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. 

जिल्ह्यात पातूर, बाळापूर, अकोला, बार्शीटाकळी तालुक्यातील लिंबांच्या बागा आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात लिंबू उत्पादकांना चांगली मिळकत होत असते. त्यामुळे दरवर्षी लिंबू लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लिंबाचा मुख्य हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून जात आहे. यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांना सुरुवातीला लिंबांना भाव मिळाला. मात्र लॉकडाऊन लावल्याने बाजारपेठा बंद झाल्या. प्रामुख्याने हॉटेल व्यवसाय, उन्हाळ्यात चालणाऱ्या थंडपेयांची दुकाने बंद राहिल्याने लिंबाला मागणीच मिळाली नाही. त्यामुळे या उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागली. त्यातही ज्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये लिंबाची फळे उशिराने काढणीला आली त्यांना आता फेकून देण्याची वेळ आलेली आहे.  ज्ञानेश्‍वर नागलकर यांच्याकडे लिंबाची पाचशे झाडे आहेत. सुरुवातीला हिरव्या लिंबाला बऱ्यापैकी दर मिळाले. सध्या हिरव्या तसेच पिकलेल्या लिंबांपासून तोडणीचाही खर्च निघेनासा झाला. हिरव्या लिंबांची १५ किलोची गोणी ९० ते १२० रुपयांना, तर पिकलेल्या लिंबांची गोणी अवघी ४० ते ५० रुपयांना व्यापारी मागत आहेत. मजुरांना एक गोणी तोडण्यासाठी ५० रुपये द्यावे लागतात. तर ग्रेडिंगचा खर्च १० रुपये, वाहतूक २० रुपये आणि अडत. हाच खर्च ९० रुपयांवर जातो. खर्च आणि मिळणारे उत्पन्न हे बरोबरीत आलेले आहे. यामुळे नागलकर यांनी पिकलेली लिंबे अक्षरशः फेकून दिली.  प्रतिक्रिया  मागील दोन हंगामांपासून लिंबांना मागणी व भावच मिळालेला नाही. इतर पिकांप्रमाणे याला हमीभाव नसल्याने लिंबू उत्पादकांचे भवितव्य अधांतरी आहे. मी या वर्षी बागेवर केलेला खर्चही निघालेला नाही. आता १५ किलो पिकलेली लिंबे ४० रुपयांत देण्याची वेळ आलेली आहे. झाडांखाली या लिंबांचा सडा पडलेला आहे. लिंबे बागेतून बाहेर काढण्याचाही खर्च निघेनासा झालेला आहे.  - ज्ञानेश्‍वर नागलकर, लिंबू उत्पादक, सावरगाव, जि. अकोला   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT