मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक टंचाईग्रस्त
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक टंचाईग्रस्त 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक टंचाईग्रस्त

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत दीड टक्क्यांइतकाच उपयुक्‍त पाणीसाठा, झपाट्याने आटणारे जलस्रोत आदीमुळे मराठवाड्यावरील जलसंकट भीषण होत आहे. आठही जिल्ह्यांतील जवळपास ५६ लाख १६ हजार लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी ३४९२ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. मागील चार दिवसांत टंचाईग्रस्तात सुमारे लाखभर लोकांची भर पडली आहे. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १० जुनअखेरपर्यंत ५५ लाख ९ हजार ७४९ लोकांची तहान टॅंकरवर होती. औरंगाबाद जिल्ह्यातील ७७८ गावे, २७१ वाड्यांमधील १८ लाख ९३ हजार २२ लोकांसाठी ११६९ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. ५५४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील ५४९ गावे, १२४ वाड्यांमधील १२ लाख ३६ हजार २०४ लोकांसाठी ६९६ टॅंकर सुरू आहेत. परभणीतील ७९ गावे, २२ वाड्यांमधील १ लाख ६६ हजार ९३१ लोकांना टंचाईची झळ बसत आहे. 

हिंगोलीत ४९ गावे, ५ वाड्यांना टंचाईच्या झळा बसत असून ७२ टॅंकर सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील ७७ गावे, २६ वाड्यांमधील १ लाख ९५ हजार १५० लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. बीड जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद आहे. जिल्ह्यातील ६६६ गावे, ३६१ वाड्यांमधील १३ लाख ८१ हजार ४४४ लोकांसाठी ९४७ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील १०४१ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

लातूर जिल्ह्यात ८३ गाव व २१ वाड्यांमधील २ लाख ३४ हजार २५४ लोकांसाठी १०९ टॅंकर आहेत. ११४१ विहिरी अधिग्रहित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील १६९ गावे, ११ वाड्या तहानल्या आहेत. सुमारे ४ लाख २१ हजार ९६५ लोकांना पाणीटंचाई सोसावी लागत आहे. त्यासाठी २३५ टॅंकर सुरू आहेत. ९८३ विहिरी अधिग्रहित आहेत. त्यापैकी टॅंकरव्यतिरीक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या जवळपास ७६९ विहिरी आहेत. 

पाऊस लांबल्याने स्थिती गंभीर

मराठवाड्यातील चारा छावण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पावसाळा उंबरठ्यावर असल्याने मशागतीच्या कामासाठी छावणीच्या दावणीतील जनावरे शेतकरी घरी घेऊन येत आहेत. त्यामुळे आजवर छावणीत पाण्याची सोय लागणाऱ्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गावात परतल्यानंतर गंभीर होऊ शकतो. लांबलेल्या पावसाने हा प्रश्‍न अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT