Lack of manpower for onion harvesting, harvesting delayed
Lack of manpower for onion harvesting, harvesting delayed 
मुख्य बातम्या

कांदा काढणीसाठी मनुष्यबळाची टंचाई, काढणी लांबणीवर 

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात १ लाख ७१ हजार ३९० उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र ६९ हेक्टरने वाढलेले आहे. आता सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे मनुष्यबळाची टंचाई असल्याने कांदा काढणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कांदा काढणीसाठी तयार होऊन पडून आहे. काहीजण अधिक पैसे देऊन तर काही तर ठिकाणी घरच्या घरी काढणीवर भर दिला जात आहे. 

नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, येवला, निफाड, सिन्नर, चांदवड या तालुक्यामध्ये कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर आहेत. दरवर्षी गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमाभागातील मजुरांसह जिल्ह्यातील आदिवासी भागातील २० हजारांहून अधिक शेतमजूर कांदा काढणीसाठी दाखल होत असतात. मात्र, लॉकडाऊन झाल्याने दरवर्षी सहज उपलब्ध होणारे मनुष्यबळ उपलब्ध होईना. त्यामुळे एवढे येथेच स्थिरावलेले अवघे ५ टक्के मजूर शेतात दिसत आहेत. 

मागील वर्षी पाण्याची अडचण असल्याने कांदा लागवडी मर्यादित होत्या. मात्र, चालू वर्षी पाणी उपलब्ध असल्याने लागवडी वाढल्या. मात्र, चालू वर्षी काढणीसाठी मनुष्यबळाची कमतरता व वाढलेले काढणी दर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अधिक वेळ व पैसा खर्च न करता घरच्या घरी काढणीवर अनेकांनी जोर दिला आहे. 

या आहेत प्रमुख अडचणी 

  • उन्हाळ्याचे दिवस असल्याने कांदा पात खराब 
  • लागवडीखालील क्षेत्र वाढले, त्या तुलनेत मजूर उपलब्ध नाही 
  • काही ठिकाणी मजूरांना बाहेर कामासाठी जाण्यास अडचणी 
  • संचारबंदी असल्याने मजूर वाहतुकीत अडथळा 
  • कोरोनाची मजुरांमध्ये भीती कायम 
  • मजूर नसल्याने स्थानिक मजुरांकडून काढणी सुरू आहे. कोरोनामुळे संचारबंदीमुळे मजूर मिळत नाहीत. त्यामुळे कामाचे नियोजन कोलमडले. मजुरांचे दर वाढले आहेत. म्हणून शेतकरी आपल्या बायका मुंलासह शिवारात कांदा काढणी करताना दिसत आहे.  - कुबेर जाधव, कांदा उत्पादक, विठेवाडी, ता. देवळा 

    कांदा काढणीसाठी मजुरांच्या टोळ्या उपलब्ध नसल्याने जास्त पैसे देऊन कांदा काढावा लागला. यावर्षी उत्पादन खर्च वाढून गेला आहे. कोरोनामुळे नियमित कामे अडचणीत सापडल्याने अडचणींचा सामना करावा लागला.  - ज्ञानेश्वर कांगुणे, कांदा उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

    Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

    Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

    Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    SCROLL FOR NEXT