Krishi Sanjeevani Week started by Krishi Vidyapeeth
Krishi Sanjeevani Week started by Krishi Vidyapeeth 
मुख्य बातम्या

कृषी विद्यापीठाद्वारे कृषी संजीवनी सप्ताहाला सुरुवात

टीम अॅग्रोवन

अकोला ः राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत बुधवारी (ता. एक) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास सुरुवात करण्यात आली.

कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठातील सर्व संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक,  विषयतज्ज्ञ, कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ परिवारातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ अखत्यारित असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देत विषयनिहाय मार्गदर्शन, चर्चा व प्रक्षेत्र भेटी दिल्या. या उपक्रमाची सुरुवात कुलगुरू डॉ. भाले यांनी अकोला तालुक्यातील दत्तक ग्राम सिसा मासा येथून केली.

या प्रसंगी त्यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देत त्यांच्या सोबत चर्चा  करीत समस्या जाणून घेतल्या. त्यावर उपाय योजनासुद्धा निर्धारित केल्या. या वेळी कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले व इतर उपस्थित होते. गाव पातळीवर तंत्रज्ञान प्रचार प्रसार करण्यात येणार असून, या उपक्रमाची सुरुवात विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम रेडवा येथून केली.

कृषी दिन साजरा दरवर्षी कृषिदिनी विदर्भातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार व मार्गदर्शन अकोला येथे होत असते. यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने कृषी दिन कार्यक्रम झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी अकोला येथील शासकीय शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर व विशेषत्वाने शेती आणि ग्रामीण समाजाविषयी कामगिरीवर प्रकाश टाकला. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य श्री गणेश कंडारकर, विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता उद्यान विद्या डॉ. प्रकाश नागरे यांच्यासह सर्व सहयोगी अधिष्ठाता, शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT