कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघा(गोकूळ)च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित दूध उत्पादक.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघा(गोकूळ)च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित दूध उत्पादक. 
मुख्य बातम्या

गोकूळ व्यवस्थापनाचे मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ) बदनामी होत असल्याच्या निषेधार्थ गोकूळ व्यवस्थापनाच्या वतीने गुरुवारी (ता. 7) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध व जनजागृती मार्चा काढण्यात आला. शासनाने दुधासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी असली तरी पडद्यामागून मात्र आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन यानिमित्ताने करण्यात आले.

या मोर्चासाठी प्रत्येक गावातून हजारो पुरुष व महिला सभासद उपस्थित होते. गोकूळमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गोकूळवर मोर्चा काढून गोकूळच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. याला शह देण्यासाठी गोकूळचे संचालक व व्यवस्थापनाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

वैयक्तिक स्वार्थासाठी गोकूळची बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी बहुतांशी वक्‍त्यांनी दिला. दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चास सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, अध्यक्ष विश्‍वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, पी. एन. पाटील. आमदार सुरेश हळवणकर आदी उपस्थित होते.

गोकूळने आंतराष्ट्रीय स्तरावर आपली ख्याती पोचवली. या दूध संघावर साडेपाच लाख कुटुंबे अवलंबून आहेत. सुमारे बत्तीस योजनांद्वारे दूध उत्पादकांची सेवा या संघामार्फत करण्यात येते. असे असतानाही काही व्यक्ती मुद्दामहून या संघाच्या व्यवस्थापनाबाबत गैरसमज पसरवून संघाची बदनामी करीत आहेत. अनेक लोकांचा उदरनिर्वांह अवलंबून असणाऱ्या या संघाच्या कारभारावर शंका व्यक्त करीत आहेत. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी श्री. महाडिक यांच्यासह विविध वक्‍यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT