कोल्हापुरात देशी बेंदूर सण उत्साहात
कोल्हापुरात देशी बेंदूर सण उत्साहात  
मुख्य बातम्या

कोल्हापुरात देशी बेंदूर सण उत्साहात

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात महाराष्ट्रीयन देशी (महाराष्ट्र) बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत देशी बेंदूर साजरा केला जातो. बेंदरानिमित्त ठिकाठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक पानवठ्यांवर जनावरांची स्वच्छता करण्यासाठी सकाळपासून गर्दी दिसून आली.

बैलांना अंघोळ घातल्यानंतर शिंगे रंगवून आकर्षक रंगरंगोटी केल्यानंतर घरातील बैल, म्हैशीसह अन्य जनावरांना पोळ्यांचा नैवैद्य दाखवून जनावरांप्रती कृतज्ञना व्यक्त करण्यात आली. सायंकाळी विशेष करून जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात कर तोडण्याचे कार्यक्रम झाले. देशी बेंदरानिमित्त गडहिंग्लज येथे आज (गुरुवारी) सदृढ बैलजोडी स्पधेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन बैलजोड्यांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार व १० हजार रुपयांची बक्षिसे उत्तेजनार्थ येणाऱ्या बैलजोड्यांनाही अनेक बक्षिसे देण्यात येणार आहे. बिन दाती, दाती आणि बैलजोडी या गटांत स्पर्धा होतील. शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धा होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

SCROLL FOR NEXT