सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो  
मुख्य बातम्या

सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक व्यावसायिकांना विनाअट सरसकट कर्जमुक्‍तीच्या मागणीसह विविध दहा मागण्यांसंदर्भात किसान मंचच्या माध्यमातून जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती किसान मंचचे निमंत्रक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.

औरंगाबादेत किसान मंचच्या झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली होती. त्याचवेळी न्याय्य मागण्यांसंदर्भात शासनाने न्यायोचित भूमिका न घेतल्यास दहा लाख शेतकरी, शेतमजूर स्वेच्छेने तुरुंगात जाणार असल्याचे इच्छापत्र प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेला प्रतिसाद मिळत असून पहिल्या टप्प्यात सातारा, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम आदी जिल्ह्यांतून जवळपास 30 ते 35 हजार शेतकऱ्यांनी तुरुंगात जाण्याचे इच्छापत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे श्री. धोंडगे म्हणाले.

येत्या 15 डिसेंबरनंतर इच्छापत्र भरून देण्याच्या मोहिमेची गती तीव्र करण्यात येणार आहे. जेव्हा दहा लाख शेतकऱ्यांची इच्छापत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जातील, तेव्हा जेल भरोसंदर्भातील घोषणा केली जाणार आहे, असे श्री. धोंडगे यांनी सांगितले.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, यासह अन्य मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. जालन्याचे किसान मंचचे जिल्हा निमंत्रक संजय सोळंके, जिल्हाध्यक्ष बळवंत देशमुख, सुरेश खांडेभराड, कैलास जिगे, रामदास रोडे, विष्णुपंत गिराम आदींची या वेळी उपस्थिती होती. अशा आहेत मागण्या

  • शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक व्यावसायिकांना
  • सरसकट विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या.
  •  शेतीमालाला उत्पादन खर्चानुसार कायदेशीर हमीभाव द्या.
  • शेतकरी, शेतमजुरांना कायद्याने आर्थिक व सामाजिक संरक्षण द्यावे.
  • पेरणी ते काढणीपर्यंतची सर्व कामे मनरेगाअंतर्गत करावीत.
  • तरुणांना काम नाही, त्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी मानधन द्यावे.
  • शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत.
  •  पिकांचे अनुदान, दुष्काळी मदत व हमी किमतीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी.
  • शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करू नये, तसेच संपूर्ण वीजबिल माफ करावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT