गडचिरोली जिल्ह्यात खरिपात  केवळ ६० टक्‍केच कर्जवाटप
गडचिरोली जिल्ह्यात खरिपात केवळ ६० टक्‍केच कर्जवाटप 
मुख्य बातम्या

गडचिरोली जिल्ह्यात खरिपात केवळ ६० टक्‍केच कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

गडचिरोली  ः आदिवासी आणि नक्षलप्रवण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही खरीप कर्जाचे उद्दिष्ट गाठण्यात बॅंकांना अपयश आले. जिल्ह्यात खरीप हंगामात केवळ ६०.३६ टक्‍केच कर्जाचे वाटप झाले. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांचा वाटा अवघा ४०.४० टक्‍के आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गामुळे अपेक्षित उत्पादकता व उत्पन्न मिळविण्यात शेतकरी अपयशी ठरले आहेत. यावर्षी देखील संततधार पावसाने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. असे असताना राष्ट्रीयकृत बॅंकांची कर्ज वितरणातील उदासीनतादेखील शेतकऱ्यांसाठी मारक ठरली आहे. खरीप हंगामासाठी १५७.७० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना केवळ ९५ कोटी १९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. कर्ज वितरणाची ही टक्‍केवारी अवघी ६०.३६ इतकीच आहे.  जिल्हा सहकारी बॅंकेला ५५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी ५१ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप बॅंकेने करीत कर्ज वितरणात आघाडी घेतली. जिल्हा बॅंकेने १६ हजार ५३ शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांना ७७ कोटी ६७ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी ३१ कोटी ७१ लाख रुपयांचे वाटप झाले. हे कर्ज ५३६८ शेतकऱ्यांना देण्यात आले. विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने १८३५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६९ लाखांचे कर्जवाटप करीत ५३.६९ टक्‍के उद्दिष्ट गाठले. गेल्यावर्षीच्या कर्जमाफीनंतर यावर्षी कर्जाचे प्रमाण वाढणे अपेक्षित होते. परंतु ते कमी झाले.  दरम्यान, बॅंकांच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांनी देखील बॅंकांच्या कर्जाकडे पाठ फिरवीत खासगी कर्जासाठी धाव घेतल्याचे चित्र यावर्षी होते. खरीप कर्जवितरणात बॅंका पिछाडल्या असतानाच रब्बी हंगामाकरिता २३ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बॅंका हे उद्दिष्ट गाठता किंवा नाही हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

दोन बॅंकांचे सात शेतकऱ्यांनाच कर्ज ऍक्‍सिस व आयसीआयसीआय या खासगी बॅंकांनी तर अवघे १६.१६ टक्‍केच कर्जवाटप कले. त्यांनी अवघ्या सात शेतकऱ्यांना ३२ लाख रुपयांचे कर्ज दिले. 

जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित दोन हजारांवर शेतकरी कर्जमाफीपासून आजही वंचित आहेत. जिल्ह्यात ४० हजार ४०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. त्यांपैकी ३५ हजार ३३१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT