सोयाबीन
सोयाबीन 
मुख्य बातम्या

परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये ५ लाख २१ हजार ८१० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

 विविध पिकांच्या ९८ हजार ५० क्विंटल बियाणांची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे केली आहे. खरिपासाठी विविध ग्रेडच्या ८९,३६० टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयबीन, मूग, उडीद, तुरीच्या क्षेत्रात वाढ तर कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख २१ हजार ८१० हेक्टर आहे. गतवर्षी ५ लाख २१ हजार ७८२ हेक्टर वर पेरणी झाली होती. यंदा सर्वसाधारण क्षेत्राएवढीच पेरणी होईल असे गृहित धरण्यात आले आहे. गुलाबी बोंड अळीमुळे मोठे नुकसान झाल्याने यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात घट होईल तर सोयाबीन, मूग, उडिद, तूर, ज्वारी, बाजरी, मका, तीळ या पिकांखालील क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
 
गतवर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांच्या ४३ हजार २१ क्विंटल बियाणांची विक्री झाली होती. प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी यंदा महाबीजकडे २७ हजार ७७८ आणि खासगी कंपन्यांकडे ७० हजार २७२ अशी एकूण ९८ हजार ५० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
 
यामध्ये सोयाबीनचे ८६ हजार २५० कपाशीचे ४ हजार ८४, तुरीचे १८७५, मुगाचे १४२५, उडदाचे ४५६, मक्याचे २२५ क्विंटल बियाणांचा समावेश आहे. कपाशीचे प्रतिहेक्टर ५.५ पाकिट यानुसार यंदा प्रस्तावित १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी ९ लाख ७ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीनचे महाबीजकडे २३ हजार, राष्ट्रीय बीज निगम आणि कृषक भारतीकडे प्रत्येकी १००० अशी एकूण २५ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे.
 
खरीप हंगामासाठी विविध ग्रेडचा ८९३६० टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया ३३,४९०, डीएपी १५,०६०, पोटॅश ३६६०, एनपीके २९७५०, सिंगल सुपर फाॅस्फेट ७४०० टन या खतांचा समावेश आहे. गतवर्षीचा ३५ हजार टन खतसाठा शिल्लक आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT