सिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात
सिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात 
मुख्य बातम्या

सिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात

टीम अॅग्रोवन

सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाचे पीक वाया गेले आहे. पाण्याअभावी करपून चालेल्या पिकात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र आहे. बळिराजाला पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.

सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त. त्यात पूर्व भाग दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. नदी व पाण्याचा स्रोत नसल्याने येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतो. पावसाळ्यात बाजरी व कडधान्ये अशी पिके घेतली जातात. गेल्या चार वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. खरिपावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. यावर्षी पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; मात्र पावसाअभावी पीक करपून चालले आहे. बाजरी, मका, सोयाबीन व कडधान्याची पिके कोमेजून गेली आहेत. महागडी बियाणे पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढले किंवा नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेतले. शिवाय त्यांचे कष्टही वाया गेले. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची स्थिती बिकट आहे. आगामी महिनाभराच्या काळात पाऊस झाला तरी खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणे शक्य नाही.

सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्य तालुक्यांतून चारा विकत आणावा लागत आहे. खरिपाचे पीक गेले तरी जनावरांना वाचविणे महत्त्वाचे असल्याने शेतकरी मिळेल ते पर्याय निवडताना दिसत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आहे, उर्वरित काळ कसा जाईल, या चिंतेत शेतकरी आहे.

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा तालुक्यात टॅँकरची मागणी वाढतच आहे. सध्या तालुक्यातील ११ गावे, ५७  वाड्या-वस्त्यांवर १३ टॅँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. निऱ्हाळे-फत्तेपूर, खापराळे, फुलेनगर, पाटपिंपरी, सोनारी, बारागावपिंप्री, आडवाडी, पांगरी खुर्द, घोटेवाडी, पिंपळे, सायाळे, गुळवंच, फर्दापूर, जयप्रकाशनगर या ठिकाणी दहा खासगी व तीन शासकीय टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

रब्बीच्या हंगामाची चिंता तालुक्याच्या पूर्व भागातच नव्हे, तर तालुक्यात सर्वत्र खरिपाचे पीक वाया गेल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. ते करपून चालले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम कसा घ्यावा, असा प्रश्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT