संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात खरिपाची पाच टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन

नगर  ः जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झालेला दिसत आहे. पावसाळ्याचा जवळपास महिना उलटून गेला असला, तरी अजूनही खरिपाच्या पेरणीला व कापूस लागवडीला वेग येताना दिसत नाही. आतापर्यंत जिल्हाभरात ५.६२ टक्के म्हणजे सरासरीपैकी २६ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. पाऊस नसल्याने सध्या अनेक भागांत पेरणी थांबली आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७८ हजार ६३८ हेक्टर आहे. त्यात कापूस लागवड साधारण एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर होते. गेल्या वर्षी खरिपाचे पीक आले नाही. रब्बीत तर पेरणीच झाली नव्हती. त्यामुळे शेती पूर्णतः तोट्यात आहे. यंदा पाऊस चांगला होईल, अशी आशा असताना यंदाही पावसाचे उशिराने आगमन झाले आहे. पावसाचा आतापर्यंत महिन्याचा कालावधी उलटला असला, तरी अजूनही अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. त्याचा परिणाम यंदाच्या खरीप लागवडीवर झाला आहे.

आतापर्यंत ५.६२ टक्के म्हणजे २६ हजार ९२० हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाची आतापर्यंत १० हजार ७३३ म्हणजे दहा टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अजून सुमारे दहा तालुक्यांत पेरणी सुरु झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.   पीकनिहाय सरासरी क्षेत्र (कंसात पेरणी झालेले क्षेत्र)  

  •  भात ः ७८८३ (०)
  • खरीप ज्वारी ः ०
  • बाजरी ः १,८२,६३१ (७,४०८)
  • रागी ः २९१२ (१)
  • मका ः ५३,१४१ (२,७९८)
  • इतर खरीप तृणधान्ये ः ११.८७८ (०)
  • तूर ः १२,०१८ (१,७४७)
  • मूग ः ९२५८ (१३१९)
  • उडीद ः ८२२९ (२२६)
  • इतर खरीप कडधान्ये ः ३९,६२८ (३,३१७)
  • भुईमूग ः ४४२० (११५)
  • तीळ ः ४५७ (१)
  • कारळे ः ३६०५ (२)
  • सूर्यफूल ः ३२२६ (०)
  • सोयाबीन ः ५८,२८२ (२,५४५)
  • इतर तेलबिया ः ५१४८ (०)
  • कापूस ः १,०५,४२७ (१०,७३३)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    SCROLL FOR NEXT