संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अकोल्यात खरिपाची ६३ टक्क्यांवर पेरणी

टीम अॅग्रोवन

अकोला  ः पावसाअभावी गेले काही दिवस रखडलेल्या पेरण्यांना या अाठवड्यात पुनरागमन झालेल्या पावसामुळे सुरवात झाली अाहे. पाऊस झाल्याने पेरण्यांचा वेग वाढला असून, जिल्ह्यात ६३ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र लागवडीखाली अाले अाहे. या महिन्यात संपूर्ण क्षेत्रावर पेरणी पूर्ण होण्याचा अंदाज अाहे.

जिल्ह्यात जून महिन्यात मृगात पाऊस झाल्याने अकोला, पातूर, बार्शिकाटळी, मूर्तिजापूर, अकोट या तालुक्यांमध्ये पेरण्या सुरू झाल्या होत्या. परंतु पावसात खंड अाल्यामुळे पेरण्यांचे काम थांबले होते. अाता या अाठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचे काम सुरू केले अाहे. अातापर्यंत तीन लाख ४ हजार ९९३ हेक्टरवर पेरणी अाटोपली अाहे. या लागवडीपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीन पिकालाच प्राधान्य दिले गेले अाहे. उर्वरित क्षेत्रापैकी बहुतांश हेक्टरवर सोयाबीनचीच लागवड होण्याची अपेक्षा अाहे.       

या हंगामात सोयाबीनला भाव कमी मिळाल्याने व तुलनेने कपाशीला चांगला भाव राहिल्याने बोंडअळीचे संकट येऊनही शेतकरी कपाशीकडे पाठ फिरवणार नाहीत, अशी अपेक्षा होती. परंतु पावसाला झालेला विलंब, बोंडअळीचे संकट, उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली अाहे. कपाशीची लागवड ७८,५७५ हेक्टरपर्यंत झाली. अागामी काळात थोड्या क्षेत्रात अाणखी वाढ होईल. मात्र कपाशीचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत पोचेल किंवा नाही अशी शंका उपस्थित होत अाहे. अपेक्षेनुसार तुरीची ३८ हजार ४४४ हेक्टरवर अातापर्यंत पेरणी झाली अाहे.

जिल्ह्यात सरासरी ४लाख ८० हजार हेक्टरपैकी अद्याप पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी व्हायची अाहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन दिवसांपासून शेतीतील कामे प्रभावित झालेली असल्याने पावसाने उघडीप देताच उर्वरित क्षेत्रावरील पेरणी पुन्हा वेगाने सुरू होईल.       

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT