In Khandesh, pressure on onion prices increased
In Khandesh, pressure on onion prices increased 
मुख्य बातम्या

खानदेशात कांद्याच्या दरावर दबाव वाढला

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः  खानदेशात कांद्याची काढणी सुरू होत आहे. परंतु जशी काढणी सुरू झाली, तसा कांदा दरावरील दबावही वाढू लागला आहे. लॉकडाऊनची भीती व वाढता कोरोना, यामुळे बाजार व्यवस्थेला फटका बसत आहे. शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. किमान दर प्रतिक्विंटल ६०० व कमाल दर १००० रुपये, असे आहेत. 

किमान व कमाल दरात गेल्या ४५ दिवसांत मोठी घसरण झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीला किमान दर ८०० व कमाल दर २८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु दरात फेब्रुवारीच्या मध्यानंतर सतत घसरण सुरू झाली. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यातच खानदेशात कोरोनाची समस्या गंभीर आहे. यामुळे बाजार समित्यांचे कामकाजही प्रभावित झाले आहे. परिणामी दरावर दबाव वाढला आहे. 

राज्यात नांदेड, बीड व औरंगाबाद भागात लॉकडाऊन सुरू आहे. याचाही परिणाम बाजारावर झाला आहे. जिल्ह्यातून परराज्यातील कांद्याची वाहतुकीलाही फटका बसत आहे. यामुळे कांदा दरात सतत परिणाम झाला आहे. 

  शेतकऱ्यांचे नुकसान

कांद्याची आवक धुळे, साक्री, पिंपळनेर (ता.साक्री), जळगावमधील जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात वाढत आहे. जळगाव बाजार समितीत या आठवड्यात प्रतिदिन सरासरी १२०० क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान दर ६०० रुपये प्रतिक्विंटल, तर कमाल दर १२०० रुपये होता. आवक गेल्या १० दिवसात वाढली आहे. याच काळात कोरोनाची समस्यादेखील वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT