खानदेशात जूनमध्ये पाच, जुलैमध्ये केवळ १३ दिवस पाऊस
खानदेशात जूनमध्ये पाच, जुलैमध्ये केवळ १३ दिवस पाऊस 
मुख्य बातम्या

खानदेशात जूनमध्ये पाच, जुलैमध्ये केवळ १३ दिवस पाऊस

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात जूनमध्ये सात तर जुलैमध्ये १३ दिवस पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाची सरासरी वाढली असून, सर्वत्र भिज पाऊस झाल्याने पिकांची स्थिती समाधानकारक आहे. तापी वगळता इतर नद्यांना पूर आलेला नसला तरी जुलै महिना पावसाच्या दृष्टीने दिलासादायक ठरला आहे.  जुलैमध्ये काही दिवस पाच मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला. यामुळे हे दिवस पावसाच्या दिवसांमधून वगळले आहेत. २० ते २३ जुलैदरम्यान खानदेशात फक्त चाळीसगाव व अमळनेरमधील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तर अक्कलकुवा व धडगावमधील सातपुडा पर्वताच्या भागातही अतिवृष्टी होऊन तेथील नद्या, नाल्यांना पूर आले. तापी नदीला पूर आल्याने मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, शहादा, नंदुरबार भागाला लाभ होणार आहे. परंतु गिरणा, वाघूर, अंजनी, मोर, भोकरी, पांझरा आदी नद्यांना पूर आले नाहीत. खानदेशात सरासरीच्या ४२ टक्के पाऊस झाला आहे.  खानदेशात मागील २४ तासात कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. सर्वत्र भिज पाऊस झाला. पावसाची संततधार गुरुवारी (ता. १) पहाटेपर्यंत सुरू होती. वाफसा स्थिती नसल्याने शेतीकामे ठप्प आहेत. तणनियंत्रण, फवारण्या, खते देणे, आंतरमशागत बंदावस्थेत आहे. भिज पावसाने पिकांची वाढ होत असली तरी हलक्‍या, मध्यम जमिनींमध्ये तण वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत गत २४ तासात झालेला पाऊस (मिलिमीटर) ः  जळगाव जिल्हा ः जळगाव १८, धरणगाव १७, एरंडोल २०, पाचोरा १७, चाळीसगाव २१, जामनेर २३, बोदवड १०, रावेर १८, चोपडा १४. धुळे जिल्हा ः शिरपूर १७, धुळे १८, साक्रीत १७. नंदुरबार जिल्ह्यात ः शहादा १६, तळोदा २१, नवापूर २१, नंदुरबार २१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT