बाजार समित्या सुरूच ठेवा; उपमुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना निर्देश
बाजार समित्या सुरूच ठेवा; उपमुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना निर्देश  
मुख्य बातम्या

बाजार समित्या सुरूच ठेवा; उपमुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना निर्देश

टीम अॅग्रोवन

पुणे ः कोरोना व्हायरसचा धसका घेतल्याने व्यापारी, कामगार संघटनांनी व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका घेतली असली तरी सरकार मात्र बाजार समित्या सुरू ठेवण्यावर ठाम आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बाजार समित्यांमधील विविध घटकांशी संपर्क साधून शहरांचा भाजीपाला व फळांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व्यवहार सुरू ठेवलेच पाहिजेत, असे बजावले आहे. त्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल, याची ग्वाही त्यांनी दिली आहे. बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी पणन संचालक सुनील पवार यांना दिले आहेत.     कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका असल्याने व्यापाऱ्यांसह विविध घटकांनी बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका बैठका घेवून जाहीर केली होती. त्यातून भाजीपाला टंचाई, भाववाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागला असता. भाववाढीला सुरवातही झाली होती. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करत संबंधितांना सुनावले आहे.   मंगळवारी सकाळी बाजार समित्यांमध्ये प्रचंड गर्दी झाली. शहरांतील किरकोळ विक्री करणाऱ्या मंडया व बहुतांश दुकाने बंद असल्याने नागरिकांनी थेट बाजार समित्यांकडे धाव घेतली. त्यामुळे अनेक शहरांतील बाजार समित्यांना मंडयांचे स्वरुप आले. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका वाढला. तो टाळण्यासाठी शहरांतील छोट्या-मोठ्या मंडया दररोज सकाळी दोन तास नागरिकांसाठी सुरू ठेवण्याची सूचना पणन खात्याने केली असून त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवाय पणन खात्यातर्फे राबवले जाणारे आठवडी बाजारही थोड्या मोठ्या जागेत सुरू ठेवणे शक्य आहे. पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने सहकार्य केले तर हे बाजार सुरू करता येतील, असे संबंधितांचे म्हणणे आहे. आॅनलाईन भाजीपाला पुरवणारी संकेतस्थळे, ॲपच्या वापराला सध्या बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉईज उत्तर भारतातील असून ते कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे या कंपन्यांची वितरण व्यवस्था विस्कळित झाली आहे.          बाजार समित्या बंद राहण्याची शक्यता असल्याने लोक जादा खरेदी करू लागले आहेत. मुंबई बाजार समितीत एरवी भाज्या व फळांची चारशे-साडेचारशे वाहने येतात. मंगळवारी मात्र मागणी वाढल्याने ७०० वाहने आली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT