पाण्याअभावी कवठेमहंकाळ तालुका संकटात
पाण्याअभावी कवठेमहंकाळ तालुका संकटात 
मुख्य बातम्या

पाण्याअभावी कवठेमहंकाळ तालुका संकटात

टीम अॅग्रोवन

सांगली : पावसाने दिलेली हुलकावणी, आटलेल्या तलावामुळे कवठेमहंकाळ तालुक्‍यातील शेतकरी नैसर्गिक संकटात आहेत. ११ तलावांपैकी तीन तलाव कोरडे, तर दोन तलावांत मृतसंचय पाणीसाठा आहे. मात्र, या तालुक्‍यात टेंभू उपसा सिंचन योजनचे पाणी आले आहे. कामे अपूर्ण असल्याने या योजनेचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील दुष्काळ दूर करण्यासाठी टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनचे पाणी दिले जाते. मात्र, टेंभू योजनेचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ येथील शेतकऱ्यांना होत नाही.

तालुक्‍याला सरासरी ४०० मिलिमीटर वार्षिक पावसाची गरज असते. यंदा केळ २८६.९० मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामा वाया गेला. रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना टॅंकरने पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यातच वाघोली प्रादेशिक योजना बंद पडली आहे.

तालुक्‍यातील तीन तलाव कोरडे आहेत. एका तलावात मृतसंचय, तर रायेवाडी तलाव सीलखाली आहे. या तलावातील पाणी वापरता येत नाही. पाच तलावांत ११६.३१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, तो केवळ पंधरा ते वीस दिवस पुरेल. हा पाणीसाठा संपुष्टात आल्यानंतर पाण्याची सोय कशी करायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यासमोर आहे.

तालुक्‍यातीतल अकरा गावांची टॅंकरची मागणी आहे. यामध्ये आगळगाव, केरेवाडी, जाखापूर, लोणारवाडी, चुडेखिंडी, अलकूड (एम), रांजणी, वाघोली, घाटनांद्रे, कुंडलापूर, ढालगाव या गावांचा समावेश आहे.

तालुक्‍यातील पावसाची आकडेवारी

महिना  आवश्‍यक पर्जन्यमान (मि. मी)  पडलेला पाऊस (मि.मी)
जून ४०.० ६६.०६
जुलै  ७४.० ५७.८२
ऑगस्ट २२.०   ३८.२६
सप्टेंबर   १४९.० ७९.६६
ऑक्‍टोबर  ४१.४ २७.१०
एकूण  ४००.४  २६८.९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT