Karmaveer Dadasaheb Gaikwad Take advantage of the empowerment plan 
मुख्य बातम्या

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा लाभ घ्या

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिराईत जमीन १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिराईत जमीन १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे. संबंधितांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.  श्री लोंढे म्हणले, ‘‘अनुसूचित जातीच्या दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे अन्य साधन उपलब्ध नसल्याने त्यांना रोजगार हमी योजना किंवा खासगी व्यक्तीकडे मजुरी करावी लागते. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा याकरिता त्यांच्या मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना कसण्याकरिता दोन एकर बागायती किंवा ४ एकर जिराईत जमीन १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येते.  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नये. जमीन सलग असावी, जे जमीन मालक शासनाने निश्‍चित केलेल्या जमिनीच्या दरानुसार (रेडीरेकनरनुसार) किंवा जिरायत जमीन कमाल ५ लाख रुपये प्रति एकर व बागायत जमीन कमाल ८ लाख रुपये प्रति एकराप्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत, अशा जमीन मालकांनी जमिनीच्या सात-बारा व आवश्यक कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे श्री लोंढे यांनी सांगितले.  

   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT