Junnar for leopard safari Assurance of the Chief Minister
Junnar for leopard safari Assurance of the Chief Minister 
मुख्य बातम्या

जुन्नर बिबट्या सफारीसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

टीम अॅग्रोवन

पुणे ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे जुन्नर बिबट्या सफारीबाबतचे आश्‍वासन शुक्रवारी (ता. २५) रात्री उशिरा मिळाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले माजी आमदार शरद सोनवणे यांनी आपले उपोषण मागे घेतले. रात्री शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले.  जुन्नरच्या बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित झाल्याच्या निषेधार्थ सोनवणे यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला तालुक्यातील सर्वच स्तरातून पाठिंबा मिळाला होता. उपोषणाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली होती. शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहीर, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समन्वयातून जुन्नर बिबट्या सफारीसाठी आश्‍वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याचे सोनवणे यांनी जाहीर केले.  दरम्यान, जुन्नर बिबट्या सफारीबाबत शनिवारी (ता.२६) अजित पवार म्हणाले, ‘‘जुन्नर बिबट्या सफारीचा २०१६ मध्ये सर्वे झाला होता. मात्र याची प्रक्रिया बंद पडलेली होती. याबाबत आमदार बेनके यांनी अधिवेशनादरम्यान हा प्रश्‍न मांडला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री आहेत. त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि अर्थमंत्री या नात्याने आमच्या तिघांची चर्चा झाली आहे. त्यानुसार जुन्नर तालुक्यातील तीन-चार जागांचे सर्वेक्षण वन विभागाने केले आहे. या सर्वेनंतर प्रकल्प मार्गी लावला जाईल. याबाबत काही जण विनाकारण राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी एप्रिलमध्ये २५ टक्के पीककर्ज वाटप

Agriculture Sowing : नांदेडमध्ये सरासरीच्या पुढे पेरणी

Unseasonal Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात 'अवकाळी'ची दमदार 'बॅटिंग'; बारामतीत घराचे पत्रे उडाले, पुणे-अहमदनगरला ‘यलो अ‍ॅलर्ट’,

Water Scarcity : गाव-वाड्यांवरील टँकरची संख्या दीड हजार पार

Jowar Crop Policy : ज्वारीला सरकारी धोरणांचा आधार मिळेल?

SCROLL FOR NEXT