Two days purchase of turmeric at Risod Market Committee
Two days purchase of turmeric at Risod Market Committee 
मुख्य बातम्या

रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदी

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे ओढा वाढत आहे. प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात तर मालेगाव, रिसोड तालुक्यात हे क्षेत्र अधिक विस्तारत आहे. शेतकऱ्यांना विक्रीची व्यवस्था म्हणून रिसोड बाजार समितीने हळदीची खरेदी-विक्री सुरू केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता बाजार समितीने आठवड्यातील दोन दिवस हळदीचे व्यवहार सुरू केले आहेत, अशी माहिती सचिव विजय देशमुख यांनी दिली आहे.

रिसोड बाजार समितीने सभापती सुमन माधवराव भुतेकर, उपसभापती प्रभाकर साबळे तसेच संचालक मंडळाच्या पुढाकारात यावर्षी ४ जूनपासून खरेदीला सुरुवात केली. पाच आठवड्यात सुमारे १८ हजार क्विंटलचे व्यवहार झाले आहेत. हळदीची आवक वाढत चालल्याने आता गुरुवारसोबतच सोमवारीसुद्धा या बाजार समितीने हळदीचे व्यवहार सुरू केले आहेत. या दोन दिवशी सकाळी ७ ते ९ या वेळेत शेतकऱ्यांना हळद बाजारात आणावी लागेल.

हळद विक्रीसाठी कुठलीही नोंदणी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क लावून वेळोवेळी हात निर्जंतुक करावेत, अशा सूचना दररोज केल्या जात आहेत. गेल्या गुरुवारी या बाजार समितीत हळदीची आठ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती.

हळदीची वाढती आवक पाहता शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने हळद खरेदीसाठी बाजार समितीने आता दोन दिवस सुरू करण्याची सूचना माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी दिली होती. संचालक मंडळाने याबाबत अडते खरेदीदार यांच्यासोबत चर्चा केली आणि आता हळद खरेदी दोन दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना या सुविधेचा फायदा होईल. - सुमन माधवराव भुतेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT