जयंत पाटील
जयंत पाटील 
मुख्य बातम्या

नाशिकचे पाणी मराठवाड्याकडे वळवा ः शेकाप नेते जयंत पाटील

टीम अॅग्रोवन

बीड  : मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायम सोडवण्यासाठी मराठवाड्याला नाशिकचे पाणी वळवण्याची गरज आहेत. यासह येथील शेतकऱ्यांना पीकविम्याचा १०० टक्के परतावा देणे आवश्‍यक आहे. यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत देण्यात यावे, यांसह विविध जिव्हाळ्याचा प्रश्नांना मराठवाडा दुष्काळी परिषदे मध्ये शेतकरी नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी आवाज उठवला.  या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब सामाजिक न्यायभवन येथे गुरुवारी (ता. ३१) मराठवाडा विभागीय दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार जयंत पाटील यांनी कोकणातील पाणी मुंबईकडे वळवा व नाशिकचे पाणी मराठवाड्याकडे वळवा अशी मागणी केली. यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के मोफत बी-बियाणे देण्यात यावेत, अशी मागणी केली. यासह बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील ३०० कारखान्यांना मजूर पुरवणार जिल्हा आहे, परंतु आतापर्यंत येथील मजुरासाठी कोणीच लक्ष दिले नाही, असे मत ही त्यांनी या वेळी व्यक्त केले.  महाराष्ट्रतील सरकार फडणवीस सरकार नसून ते सरकार फसवणूक करणारे असल्याचा आरोपीही त्यांनी केले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, की आता निवडणूक येथील त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पॅकेज जाहीर केले जाईल, परंतु त्यांची अमंलबजावणी होईपर्यंत दोन महिने निघून जातील. त्यामुळे अशा फसव्या घोषणांपासून सावध राहण्याचा सल्लाही या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी दिला. या वेळी माजी मंत्री गंगाधर गाडे, काकासाहेब शिंदे, आमदार बाळाराम पाटिल, उमाकांत राठोड, बाळासाहेब घुमरे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी व कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  गोपीनाथ मुंडेंसारखा नेता पुन्हा होणे नाही. मात्र आता त्यांची पुण्याई संपली आहे. ऊसतोड कामगरांचे सध्या हाल सुरू असताना त्यांच्या नावावर मते मागणारे आरामात राहतात, हे चित्र बदलले पाहिजे. प्रस्थापितांना धक्का द्यायची वेळ आली आहे. राज्यातले कारखाने या जिल्ह्यातील कामगारांनावर चालतात, मात्र या कामगारांना काय मिळाले. यांच्या जिवावर अनेक नेते झाले मात्र कामगार अजून तसेच आहेत, असे मत जयंती पाटील यांनी बीडमध्ये व्यक्त केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT