जालना : जिल्ह्यातील थार शिवारातील द्राक्ष शेतीचे गारपीटीने झालेले नुकसान.
जालना : जिल्ह्यातील थार शिवारातील द्राक्ष शेतीचे गारपीटीने झालेले नुकसान. 
मुख्य बातम्या

जालना, बीडमध्ये गारपिटीचा तडाखा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्याला रविवारी (ता. ११) सकाळी गारपिटीचा तडाखा बसला असून, बीड जिल्ह्यातदेखील गारपीट झाली. गारपिटीने रब्बी पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्‍यात काही जण जखमी झाले असून, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पाहणी करत प्रशासकीय यंत्रणेला नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे करण्याचे सूचना दिल्या. जाफराबाद तालुक्‍यात रविवारी (ता. ११) सकाळी तुफान गारपीट झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या आंबा, डाळिंब, द्राक्ष बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या असून, कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी कोलमडून पाडला आहे. तसेच जालना तालुक्यात देखील अनेक ठिकाणी गारपिटीने नुकसान झाले आहे.  

नळविहिरा येथील आंबा व डाळिंब बागायतदार संजय मोरे पाटील व अन्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच निवडुंगा, टेंभुर्णी, आंबेगाव, काळेगाव येथील द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. नुकसानीची माहिती मिळताच हिवरा (काबली) मंडळाचे तलाठी लागलीच प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करत आहेत.

मंठा तालुक्‍यातील पाटोदा, विडोळी, मंगरुळ, गेवराई, मंठा, उंबरखेडा, पांगरी बु., सोनुनकरवाडी, पांगरा ग., किनखेडा, पेवा, किर्तापूर, पेवा, खोरवड, अंभुर शेळके, देवठाणा, मोहदरी आदी गावांत रविवारी (ता. ११) गारांचा पाऊस पडला. शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वारे व गारांचा पाऊस पडल्याने शाळू ज्वारी, गहू, हरभरा आदी काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मॉर्निंग वॉक व घराबाहेर पडलेले वृद्ध व इतर नऊ-दहा नागरिक गारांचा मार लागून जखमी झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड परिसरात सकाळी ७ ते ३० वाजेदरम्यान दोन मिनिटे गारा पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्‍यातील नळविहिरा परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरवात झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT