मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील ३७० गावांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्‍यांमधील ३७० गावे ही दुष्काळी मदतीसाठी पात्र ठरणार असून, त्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतीच जिल्ह्यातील १५०२ गावे, पाडे आदींची सुधारित पैसेवारी जाहीर केली. प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार जिल्ह्यातील एक हजार १३२ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक आहे.  जिल्ह्यातील १५०२ गावांची पैसेवारी पावसाळा सुरू असताना म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी प्रशासनाने जाहीर केली होती. त्यात एक हजार ४६७ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक होती. तर केवळ ५० गावे ही ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीच्या यादीत होती. यानंतर प्रशासनाने ऑक्‍टोबर अखेरीस सुधारित पैसेवारीची माहिती जारी केली आहे. अर्थातच सुधारित पैसेवारीमध्ये जिल्ह्यातील दुष्काळी छायेतील गावांची संख्या वाढली असून, ती तब्बल ३२० ने अधिक आहे.  तीन तालुके पूर्णतः दुष्काळी जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि अमळनेर हे तालुके पूर्णतः दुष्काळी दाखवले आहेत. त्यात अमळनेर तालुक्‍यातील १५४, मुक्ताईनगरमधील ८१ आणि बोदवड तालुक्‍यातील ५१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 

५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारीची गावे जिल्ह्यातील ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असलेल्या गावांमध्ये जळगाव तालुक्‍यातील ९२, जामनेरातील १५२, भुसावळातील ५४, रावेरातील १२१, पाचोरामधील १२९, चोपडामधील ११७, भडगावमधील ६३, पारोळा तालुक्‍यातील ७९, यावलमधील ८१, चाळीसगाव तालुक्‍यातील ९० गावांचा समावेश आहे.  सुधारित पैसेवारीवरही आक्षेप जळगाव जिल्ह्यात पावसाळ्यात कुठल्याही तालुक्‍यात सरासरीएवढा पाऊस झाला नाही. फक्त तीनच तालुके दुष्काळी दाखविणे योग्य नाही. प्रशासनाने आकडेवारी सादर करून बनवाबनवी करू नये. यामुळे एका तालुक्‍याला न्याय व दुसऱ्यावर अन्याय होतो. खरीप तर गेलाच आता रब्बी हंगामाबाबतही जेमतेम, अशी स्थिती आहे. दुष्काळी गावांची संख्या अधिक आहे, असे शेतकरी संघटनेचे कडूअप्पा पाटील यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT