जळगाव ः तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या कार्यक्षेत्रात सहा मोठे, सात मध्यम व तेरा लघू प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. या एकूण २६ प्रकल्पांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांचा समावेश आहे.
या १४ प्रकल्पांवर महामंडळ स्थापनेपासून आतापर्यंत सहा हजार कोटींवर खर्च झालेला आहे. हे प्रकल्प २०२४ला पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जलसंपदा विभागाच्या सचिवांनी मागील वर्षी नाशिक येथे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले होते. मात्र कामांची स्थिती व मिळणारा निधी पाहता प्रकल्प २०२४ पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे.
हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे १२ हजार ३० कोटींची गरज आहे. प्रकल्पात पाणी साठवण्यास अजून किती वर्षे लागतील, असे सांगणे तूर्त कठीण आहे. १९५८ मध्ये एस. एम. अय्यंगार समितीने सादर केलेल्या अहवालानुसार तापी खोऱ्यात राज्यनिहाय पाणी वाटपानुसार महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला २६१.४० अब्ज घनफूट पाणी मिळाले आहे. १९८२ मध्ये आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रास १९१.४० अब्ज घनफूट व मध्य प्रदेशला ७० अब्ज घनफूट पाण्याचे वाटप मान्य झाले.
पाणीवाटप करारानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले तापी खेाऱ्याचे पाणी जिल्ह्यातील प्रकल्प अपूर्ण असल्याने गुजरातमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडवून त्याचा जिल्ह्यातील कृषी सिंचनासाठी लाभ व्हावा यासाठी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी सर्व आमदारांनी नाशिक येथे बैठकीत गतवर्षी केली होती.
केंद्राकडून प्रकल्पांना निधी मिळणार आहे. मात्र हा निधी केंद्र शासन नाबार्डमार्फत राज्य शासनाला उपलब्ध करून देते. त्यासाठी राज्य शासनाला तीस टक्के निधी उपलब्ध करून दिल्यावर सत्तर टक्के निधी मिळतो. कोरोनामुळे राज्याला जितका निधी देणे शक्य आहे. त्या तुलनेत केंद्राकडे निधी मागणी केली जात असल्याचे चित्र आहे.
प्रकल्प व निधीची गरज (रक्कम कोटींत) बोदवड उपसा ३३५९.३६ निम्न तापी प्रकल्प २३०० (पाडळसरे) वाघूर ९००.९२ वरणगाव तळवेल उपसा ४०४.६५ कुऱ्हा वढोदा उपसा १५३७.८९ भागपूर उपसा २३१७.१२ शेळगाव बॅरेज ३५२ वरखेडे लोंढे ३७४ पद्मालय उपसा ५६६.९२ अंजनी मध्यम प्रकल्प ३५.९० हतनूर टप्पा १ २८०.०० तीन लघू प्रकल्प ७०.०० एकूण १२३०८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.