जळगाव बाजार समितीत नवीन गाळ्यांचे काम सुरू
जळगाव बाजार समितीत नवीन गाळ्यांचे काम सुरू 
मुख्य बातम्या

जळगाव बाजार समितीत नवीन गाळ्यांचे काम सुरू

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जळगाव बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात मुख्य प्रवेशद्वारानजीक १८० गाळ्यांचे दुमजली संकुल उभारण्यास सुरवात झाली आहे. हे संकुल येत्या चार महिन्यांत बांधून पूर्ण होईल.  हे नवीन व्यापारी संकुल आडत असोसिएशनने विरोध केल्याने वादात अडकले होते. यासंदर्भात न्यायालयातही आडतदारांची दाद मागितली होती. संकुलामुळे यार्डातील पहिल्या रांगेतील आडतदारांना रस्ता कमी मिळेल. कोंडी होईल, लिलाव, तोलाईसंबंधी अडचणी येतील, असे आडतदारांचे म्हणणे होते. यावर बाजार समिती प्रशासनाने आपली बाजू न्यायालयात मांडली. शिवाय शासनाने मुख्य रस्त्यासंबंधी दिलेल्या आदेशानुसार या संकुलाचे काम सुरू झाले. हे १८० गाळ्यांचे संकुल आहे. चार इमारतींमध्ये हे संकुल उभारले जात आहे. संकुलात प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार असतील. या संकुलाच्या गाळ्यांचे दरवाजे जळगाव-औरंगाबाद मार्गाकडे असतील. सध्या पाया व त्यासंबंधीचे स्टीलवर्क सुरू आहे. बांधकामानजीक पत्रांची कुंपण भिंत उभारण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानतंर ही कुंपण भिंत हटविली जाईल.  संकुलातील गाळ्यांची विक्री दिवाळीच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. किमती विकासक निश्‍चित करील. त्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. परंतु, या संकुलाच्या माध्यमातून बाजार समितीला दरमहा एक लाख ८० हजार रुपये शुल्क भाड्यापोटी मिळेल. या संकुलातील गाळ्यांचा उपयोग खरेदीदार धान्य खरेदी-विक्री व्यक्तिरिक्त इतर कारणांसाठीदेखील करू शकतील. या संकुलात रेस्टॉरंट, कृषी केंद्र, किरकोळ धान्य विक्री दुकाने आदी मोठ्या संख्येने सुरू होतील, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT