It's time for you to talk about the budget, Devendraji ः uddhav thakray
It's time for you to talk about the budget, Devendraji ः uddhav thakray 
मुख्य बातम्या

देवेंद्रजी तुमच्यामुळेच अर्थसंकल्पावर बोलण्याची वेळ ः उद्धव ठाकरे

टीम अॅग्रोवन

मुंबई ः विधिमंडळात अर्थसंकल्पावर बोलण्याची वेळ आपल्यावर येईल याचा विचार मी कधीच केला नव्हता. मात्र, देवेंद्रजी तुमच्यामुळेच मला ही संधी मिळाली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. ४) लगावला. ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो तो विषय अर्थसंकल्पात मांडायला हवा. मात्र, मोदी सरकारचा देशाच्या संबंध अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा नोटाबंदीसारखा विषय अर्थसंकल्पात का मांडावासा वाटला नाही? अशी विचारणाही ठाकरे यांनी केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प...सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुस्तकाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना फडणवीसांना चिमटे काढले. त्यामुळे राजकीय टोलेबाजीने पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याची रंगत वाढली. फडणवीस आणि आपण चांगले मित्र आहोत. मित्रावर अर्थसंकल्पावर बोलण्याची वेळ आल्याचे पाहून त्यांनी हे पुस्तक लिहिले असावे. आता अर्थसंकल्प कसा अंमलात आणावा हे आपल्याला कळले आहे. त्यामुळे पुढील पाचदहा वर्ष त्यांनी अशीच पुस्तके लिहावीत, अशा शुभेच्छा ठाकरे यांनी फडणवीस यांना दिल्या आणि सभागृहात हशा पिकला.

फडणवीस यांचे पुस्तक पाहता त्यांच्या अंगी उत्तम साहित्यिकाचे गुण आहेत. तुम्ही राजकारण सोडून साहित्यिक व्हायला हरकत नाही. दिल्लीच्या राजकारणात एक उत्तम राजकारणी व साहित्यिक म्हणून तुम्हाला वाव आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला माजी राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत पवारांनी फडणवीसांना दिल्लीत नेण्याची विनंती केली. फडणवीस दिल्लीला जातील तेव्हा सर्वाधिक आनंद सुधीर मुनगंटीवार यांना होईल, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली. नाना पटोले यांनी फडणवीस यांची कामगिरीविरोधी बाकावरच अधिक खुलते त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ विरोधी बाकावर काम करावे, अशा शुभेच्छा दिल्या. तर पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांवर बातम्या देणाऱ्या अँकरने अर्थसंकल्प समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे मत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

लवकरच हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती दरम्यान, या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी भाषेतील आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. अर्थसंकल्पाची भाषा खूप क्लिष्ट मानली जाते. आमदारांनाही अर्थसंकल्प लक्षात येत नाही, असा आपला अनुभव आहे. लोकांना सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावा म्हणून आपण पुस्तक लिहिल्याचे फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT