It continues to rain; Wet drought
It continues to rain; Wet drought 
मुख्य बातम्या

पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावट

टीम अॅग्रोवन

परभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून, अनेक ठिकाणी दमदार सुरुवात झाली आहे. परंतु अतिपावसामुळे मराठवाड्यात पुरती दाणादाण उडाली असून, पाणी साचल्याने पिके जागेवर उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, काढणीला आलेले पीक मातीमोल होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जवळपास १४ लाख हेक्टर पिकाला फटका बसला आहे. तर २१ लाखांवर शेतकरी बाधित झाले आहेत. परभणी, हिंगोलीत यंदा आजवर अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेकवेळा अतिवृष्टी झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा अंदाज आहे.सततच्या पावसामुळे पाणी साचून राहिल्याने उभी पिके सडून गेली आहेत. खरीप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.  

दरम्यान, गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी जिल्ह्यातील ५२ मंडळांमध्ये सरासरी ११.७ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यातील २५ मंडलांत सरासरी ७.१ मिलिमीटर पाऊस झाला.

येलदरी, सिद्धेश्‍वर, निम्न दुधना धरणातून विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक वाढल्यानंतर विसर्गात वाढ केली जात आहे. त्यामुळे दुधना, पूर्णा काठच्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या दोन जिल्ह्यांतील गोदावरी, पूर्णा, दुधना, करपरा, कयाधू, गलाटी, लेंडी आदी नद्यांच्या काठच्या तसेच छोटे-मोठे ओढे, नाल्या काठच्या पाणथळ जमिनीमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने उभी पिके सडून गेली आहेत. 

सोयाबीन, तूर, कपाशी ही खरीप पिके, ऊस, केळी, संत्रा, मोसंबी आदी फळपिके, पालेभाज्या, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भिजल्याने दाण्याची प्रत खराब झाली आहे. परभणी जिल्ह्यात १ लाख ६० हजार हेक्टरवरील, तर हिंगोली जिल्ह्यात ९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. पाऊस सुरूच राहिला तर नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.

  • मराठवाड्यात १४ लाख हेक्टर पिकांना फटका
  • नद्यांच्या काठावरील शेतीपिके खरडली
  • अतिपावसाने परभणीत पिके जागेवर सडली
  • सोयाबीन, उडीद, मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT