'हायसिस'सह इतर ३० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; शेतीला उपयुक्त
'हायसिस'सह इतर ३० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; शेतीला उपयुक्त 
मुख्य बातम्या

'हायसिस'सह इतर ३० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; शेतीला उपयुक्त

वृत्तसेवा

श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी (ता.२९) 'पीएसएलव्ही- सी ४३' या प्रक्षेपकाद्वारे 'हायसिस' या भारताच्या भूनिरीक्षक उपग्रहासह इतर ३० उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. 'हायसिस'कडून मिळणाऱ्या माहितीचा वापर कृषीसह विविध क्षेत्रांमध्ये केला जाणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणानंतर १७ मिनीट २७ सेकंदांनी भारताचा हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट (हायसिस) त्याच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आला. त्यानंतर तासाभराच्या कालावधीत इतर आठ देशांचे तीस उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षांमध्ये सोडण्यात आले. 'हायसिस' हा 'इस्रो'ने विकसित केलेला अत्याधुनिक उपग्रह आहे. या उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीचा वापर कृषी, वन, मृदा परीक्षण, भूशास्त्र, किनारपट्टीचा अभ्यास, भूजलसाठ्यांचा अभ्यास, पर्यावरण आणि उद्योगांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास अशा विविध क्षेत्रांमध्ये केला जाणार आहे. पीएसएलव्ही- सी ४३ चे हे ४५ वे उड्डाण होते. या यशाबद्दल 'इस्रो'चे प्रमुख के. सिवान यांनी सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले. 'इस्रो'चे लक्ष आता पुढील मोहिमेकडे लागले आहे. या मोहिमेमध्ये भारताचा सर्वांत अवजड उपग्रह जीसॅट ११ हा पाच डिसेंबरला फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपित केला जाणार आहे.

प्रक्षेपणाचे वैशिष्ट्य या प्रक्षेपणादरम्यान शास्त्रज्ञांनी चौथ्या टप्प्यातील इंजिन दोन वेळेस सुरू केल्याने हे या प्रक्षेपणाचे वैशिष्ट्य ठरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रक्षेपणानंतर ६३६.३ किमी उंचीवर 'हायसिस' विलग केल्यानंतर चौथ्या टप्प्यातील इंजिन बंद करण्यात आले. 'हायसिस' कक्षेत स्थिरावल्यानंतर शास्त्रज्ञांनी इंजिन दोन वेळेस सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली. याद्वारे त्यांनी तीस उपग्रह कक्षेत सोडत सोडत उपग्रहाला ५०४ किमी उंचीवर खाली आणले. ही 'इस्रो'साठीची दीर्घ मोहीम होती. अशाच प्रकारची मोहीम २०१६ लाही राबविण्यात आली होती.

'हायसिस'ची वैशिष्ट्ये

  • प्राथमिक उद्देश : क्षकिरण आणि लघू तरंग लांबी क्षेत्रात पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे
  • वजन : ३८० किलो
  • उपग्रहाचा महत्त्वपूर्ण भाग असलेली ऑप्टिक इमेजिंग डिटेक्‍टर चिप ही स्वदेशी बनावटीची
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

    Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

    Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

    Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

    Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

    SCROLL FOR NEXT