Investigation of Talatha documents started
Investigation of Talatha documents started 
मुख्य बातम्या

तलाठी दप्तराची झाडाझडती 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तलाठ्यांचे दप्तर तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी दप्तर तपासणीसाठी विविध पथके तयार केली आहेत. पथकांना निर्धारित तपासणीचा कार्यक्रम देण्यात आला आहे. 

शनिवार, रविवार म्हटला म्हणजे शासकीय सुटीचा दिवस. या दिवशी शासकीय अधिकारी, कर्मचारी निवांत असतात. मात्र, जिल्हाधिकारी अभिजित राऊत नेहमी पेंडीग कामे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन  करताना दिसतात. असे असले तरी शनिवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांनी राऊत यांनी चक्क सकाळी अकराला तलाठी दप्तर तपासणीचा कार्यक्रम आखला. अन्‌ जळगाव तहसीलदार नामदेवराव पाटील यांना सोबत घेत ते धानोरा बुद्रूक (ता. जळगाव) येथील तलाठी कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी केली. अशी तपासणी सर्वत्र होणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दप्तर तपासणीच्या कार्यक्रमाने सर्वच धास्तावले होते. आपलीही दप्तर तपासणी होते का? असे एकमेकांना मोबाइलद्वारे विचारणा करू लागले. काहींनी तर चक्क कार्यालयात जाऊन दप्तर तपासणीची तयारीही सुरू केली होती. जिल्हाधिकारी राऊत यांनी धानोरा बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात जाऊन तलाठी सारिका दुर्गूडे यांच्याकडील दप्तराची तीन तास तपासणी केली. 

या तलाठी कार्यालयांतर्गत २५२ सातबारा उतारे आहेत. त्यांच्यावर काही नोंदी अपूर्ण आहेत का? इतर नोंदीसह इतर कामाची तपासणी केली. तपासणीत काय त्रुटी आढळल्या त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी स्वतः तयार करतील. दप्तर तपासणीवेळी तहसीलदार नामदेवराव पाटील, मंडलाधिकारी किरण बाविस्कर, नायब तहसीलदार विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT